Turmeric Market : हिंगोलीत हळदीला क्विंटलला १४४०० ते १६६०० रुपये दर

Turmeric Rate : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये बुधवारी (ता.२९) हळदीची २२१० क्विंटल आवक झाली.
Turmeric Market
Turmeric Market Agrowon

Turmeric Production : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये बुधवारी (ता.२९) हळदीची २२१० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान १४ हजार ४०० ते कमाल १६ हजार ६०० रुपये तर सरासरी १५ हजार ५०० रुपये दर मिळाले.

संत नामदेव हळद मार्केटमध्ये आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तीन दिवस हळदीची आवक घेतली जात आहे. मागील आठवड्यातील तीन दिवस हळदीची २२१० ते २८२५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल सरासरी १५५०० ते १६४०० रुपये दर मिळाले.

मागील काही महिन्यांपासून हिंगोली येथील मार्केटमध्ये हळदीचे सरासरी दर १५ हजार रुपयापर्यंत आहेत. दरात तेजी असली तरी उत्पादकता कमी झाली आहे. नवीन हळद लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांनी घरचे बेणे ठेवले आहे. त्याचा मार्केटमधील हळदीच्या आवकेवर परिणाम झाला आहे.

Turmeric Market
Turmeric Market News : हिंगोलीत हळदीला मिळाला ५८९८ ते १४५८८ रुपये दर

सोमवारी (ता.२७) हळदीची २८२५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १५ हजार ३०० ते कमाल १७ हजार ५०० रुपये तर सरासरी १६ हजार ४०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता.२४) २२०५ क्विंटल आवक असताना किमान १४३३५ ते कमाल १६८२५ रुपये तर सरासरी १५५८० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.२२) २५०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १४५०० ते कमाल १७००० रुपये तर सरासरी १५७५० रुपये दर मिळाले.

वसमतमध्ये १५७०० ते १७५५५ रुपये दर

वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता.२७) हळदीची १९२५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १५७०० ते कमाल १७५५५ रुपये तर सरासरी १६६२८ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता.२४) ३१६४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १५५०० ते कमाल १७२३७ रुपये तर सरासरी १६३६८ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com