Agrowon Podcast : कांद्याचा बाजार टिकून; कापूस, सोयाबीन, आले तसेच ज्वारी दर काय ?

Agriculture Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, आले आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीन नरमले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील नरमाई कायम आहे. सोयाबीन १० डाॅलरपेक्षाही कमी पातळी गाठेल, असा होरा अनेक जण व्यक्त करत होते. पण सोयाबीन १० डाॅलरच्या आसपास कायम दिसत आहे. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे निचांकी १०.०४ डाॅलरवर पोचले होते. तर सोयापेंड ३२० डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसू दबावातच

कापसाचा भाव आजही दबावातच आहेत. जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये सध्या अनिश्चित परिस्थिती आहे. त्यामुळे कापसाच्या मागणीवर परिणाम झाला. मागणी घटली आणि विक्री वाढल्याचा परिणाम कापसावर दिसून येत आहे. कापसाचा भाव गेल्या चार वर्षातील सर्वाच निचांकी पातळीवर कायम आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६७.१४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५६ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Market Update
Chana Procurement Scam : परभणीत हमीभाव हरभरा खरेदी गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा

कांद्याचा बाजार टिकून

देशातील  बाजारात वाढलेल्या भावात कांद्याला उठाव काहीसा कमी झालेला दिसत आहे. त्याचा दरावरही परिणाम दिसून आला. कांद्याचा भाव ३ हजारांच्या पातळीवरून गेल्या दोन आठवड्यात नरमला आहे. सध्या कांदा २२०० ते २७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कांद्याची निर्यात किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कामुळे कमी झालेली आहे. तरीही कमी पुरवठा आणि मागणी यामुळे कांदा बाजारातील दराची स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

Market Update
Agrowon Podcast : तुरीचा बाजार काहीसा नरमला; कापूस, सोयाबीन, टोमॅटो, तसेच काय आहेत हळद दर?

आल्यातील चढ उतार कायम

आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सध्या ५ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.       

ज्वारीचे भाव दबावातच

ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे. बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली. ज्वारीचा बाजार सध्या दबावात आला आहे. राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे. पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत. सध्या ज्वारीला सरासरी वाणानुसार २ हजार ३०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com