Agriculture Market
Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीचे भाव तेजीतच ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच तूरीचे दर काय आहेत?

Anil Jadhao 

Market Bulletin : कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार कायम आहेत. मागील काही दिवसांपासून कापूस भाव दबावातच आहे. आज दुपारी ७१.७९ सेंटवर होते. देशातील वायदेही ५६ हजार रुपयांपर्यंत कमी झाले होते. बाजार समित्यांमध्ये भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवकही टिकून आहे. कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत नरमाई होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारी ११.७४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६१ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

कांद्याच्या भावात आज काही ठिकाणी प्रतिक्विंटल सरासरी १०० ते २०० रुपयांची वाढ दिसून आली. कालच्या नरमाईनंतर आजही बाजारात सुधारणा झाली होती. आज कांद्याचा सरासरी भाव २२०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये पाऊस सुरु झाल्याने कांद्याची आवक कमी झाली होती. तसेच दरात चांगली सुधारणा झाल्यानंतर बाजारात आवक वाढत आहे. यापुढच्या काळातही कांदा आवकेनुसार बाजारात बदल होऊ शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आयात तुरीचे भावही १२ हजारांच्या दरम्यान असल्याने देशातील तूर बाजाराला चांगला आधार मिळत आहे. म्यानमार आणि आफ्रिकेतील देशांमधून काही प्रमाणात तूर आयात होत आहे. देशातील बाजारातही पुरवठा कमी आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी या दरम्यान तूर विकली आहे. त्यामुळे कमी प्रमाणात तुरीचा साठा उपलब्ध आहे. सध्या तुरीला सरासरी ११ हजार ते ११ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून एका भावपातळीच्या दरम्यान दिसत आहे. देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. पोल्ट्री, इथेनाॅल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केला जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. मक्याला २ हजार १०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Fund : पीएम किसानचा हप्ता २ हजाराने वाढणार ? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता

Forest Encroachment : वन क्षेत्रातील पिकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई

Kharif Sowing : जूनमधील असमतोल पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये अडथळे

Agrowon Podcast : हळदीत काहीशी नरमाई; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहेत तूर दर ?

Kolhapur Rain : कोल्हापुरातील २४ बंधारे पाण्याखाली, पंचगंगेची पाणी पातळी ५ फुटांनी वाढली

SCROLL FOR NEXT