Onion Market Rate : कांदा खरंच तेजीत की व्यापाऱ्यांची खेळी ? कांद्याच्या भावात मोठ्या तेजीची शक्यता आहे का?

Market Update : बाजारात दोन दिवसांमध्ये भाव ३०० ते ५०० रुपयांनी वाढले आणि पुन्हा ३०० रुपयांनी कमी झाले.
Onion
OnionAgrowon

Pune News : कांदा बाजारात मागील चार-पाच दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. कांद्याचे भाव वाढून अनेक बाजारात २५०० ते २८०० रुपयांपर्यंत पोचले होते. पण कालपासून पुन्हा मार्केट कमी होऊन ३०० रुपयांपर्यंत तुटले. बाजारात दोन दिवसांमध्ये भाव ३०० ते ५०० रुपयांनी वाढले आणि पुन्हा ३०० रुपयांनी कमी झाले.

दक्षिणेतील बाजारात कांद्याच्या भावात चढ उतार सुरु आहेत. त्याप्रमाणे देशातील बाजारातही चढ उतार दिसत आहेत, असे व्यापारी सांगत आहेत. तर शेतकऱ्यांनी बाजारात आवक वाढवावी, यासाठी व्यापाऱ्यांची ही खेळी आहे, असे शेतकरी सांगत आहेत. 

चार दिवसांपुर्वी सोशल मिडियावर ३४०० ते ३५०० रुपयांच्या पावत्या फिरत होत्या. त्यामुळे बाजारात कांदा भावात मोठी वाढ झाल्याची चर्चा सुरु झाली. कांदा पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आला. कांदा आणतोय डोळ्यात पाणी, अर्थकारण कोलमडलं, अशा नेहमीच्या बातम्या सुरु झाल्या. पण कांद्याचा वाढलेला भाव दोनच दिवसांमध्ये पुन्हा ३०० रुपयांनी कमी झाला. त्यामुळे बाजारात आणखी चर्चा सुरु झाली.

बाजारात पावसामुळे कांदा आवक कमी होती. ही आवक वाढावी, दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी बाजारात कांदा आणावा यासाठी दोन दिवसांसाठी व्यापाऱ्यांनी भाव वाढवले, असे शेतकरी सांगत होते. तर सोशल माध्यमांवर फिरणाऱ्या पावत्या ह्या व्यापाऱ्यांच्याच मालाच्या होत्या, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. 

Onion
Onion Rate : निवडणुकीनंतर उन्हाळ कांद्याला दराचा टेकू

व्यापाऱ्यांचं म्हणणं वेगळं आहे. दक्षिणेतील राज्यात कांद्याचा भाव ३५०० रुपयांपर्यंत पोचला होता. त्यामुळे राज्यातही कांदा २५०० ते २८०० रुपयांच्या दरम्यान पोचला. पण दोन दिवसांपासून पुन्हा येथील मार्केट कमी झाले त्यामुळे आपल्याकडेही भाव कमी झाले आहेत. कांदा भावात हे चढ उता होण्यामागे बाजारातील कांदा आवक किंवा व्यापाऱ्यांची खेळी याचा काही संबंध नाही. पुढे कांद्याचा भाव कमी जास्त झाल्याचा हा परिणाम आहे, असेही व्यापारी म्हणतात. 

कांद्याच्या भावात आचानक वाढ झाल्यानंतर मात्र अनेक शेतकरी कांदा विक्री वाढवत आहेत. बाजारात आवक वाढल्याचा दरावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार स्थिरावल्यानंतर आवकेचा दबाव वाढणार नाही, असे विक्रीचे नियोजन करावे, असे आवाहन अभ्यासकांकडून केले जात आहे. 

Onion
Bogus Onion Subsidy : बोगस कांदा अनुदानप्रकरणी बाजार समिती सचिवांसह १६ जणांवर गुन्हा

शेतकरी आणि बाजारभाव अभ्यासक शिवाजी आवटे म्हणतात की, शेतकऱ्यांनी मार्केटकडे न पाहता दिवळीपर्यंत माल पुरेल अशी टप्प्याटप्प्याने विक्री करावी. म्हणजेच बाजारात अचानक आवक वाढणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आवटे यांनी केले आहे. 

यंदा कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यातच मागील काही वर्षांचा विचार केला तर उत्पादन घटल्याने बाजारातील कांद्याचे भाव काहीसे अधिक होते. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान कांदा विकला. आता हा कांदा व्यापारी आणि स्टाॅकिस्ट यांच्या हातात गेला. शेतकऱ्यांकडील चाळीतील कांदाही यंदा कमी आहे. चाळीतील कांदा जवळपास २० ते ३० टक्क्यांनी कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

मुळात कांदाच कमी उपलब्ध असल्याने निर्यातीवर ४० टक्के शुल्क आणि ५५० डाॅलर किमान निर्यात मूल्यू असल्याने कांदा निर्यात कमी होऊनही भाव २ हजार ते २३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील आवक आणि निर्यातीनुसार भावात ५०० रुपयांचे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com