Market Update  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटोचा भाव कमी झाला; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत डाळिंबाचे दर ?

Commodity Market Rate : आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, टोमॅटो आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन दबावातच

सोयाबीनचा बाजार शेतकऱ्यांना अडणीत आणत आहे. भावावरील दबाव कायम आहे. खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. सोयाबीनची हमीभावाने सरकार खरेदी करत आहे. मात्र ही खरेदी खूपच धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे त्याचा आधार खुल्या बाजारात मिळताना दिसत नाही. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. आज सोयाबीनचे वायदे ९.८१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस स्थिर

देशात कापसाचे भाव स्थिर आहेत. कापसाच्या भावात सुधारणा होण्याची शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र बाजारावर सध्या आवकेचा दबाव आहे. कापसाची आवक सध्या शिगेला पोचली. रोज २ लाख गाठींपेक्षा आवक होत असून काल २ लाख १२ हजार गाठींची आवक झाली होती. त्याचा कापूस बाजारावर दबावात आहे. आजही देशातील बाजारात ६ हजार ९०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर सीसीआयची खरेदीही सुरु आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

डाळिंबाचा बाजार टिकून

बाजारातील आवक कमी असल्याने डाळिंबाचे भाव सध्या टिकून आहेत. पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा डाळिंब पिकाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे बाजारातील आवक कमी तर आहेच शिवाय गुणत्तापूर्ण मालाचा तुटवडा जाणवत आहे. बाजारात सध्या डाळिंबाची आवक पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर बाजारात डळिंबाला सरासरी ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. गुणत्तापूर्ण डाळिंब आजही १५ हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. डाळिंबाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

तूर टिकून

देशात तुरीची उपलब्धता कमीच आहे. देशातील काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरु झाली. पण ही आवक अगदीच किंचित आहे. आवकेचा दबाव वाढायला आणखी महिना ते दीड महिना लागू शकतो. त्यामुळे सध्या दरात चढ उतार सुरु आहेत. सध्या बाजारात तुरीला सरासरी ९ हजार ते १० हजारांचा भाव मिळत आहे. तुरीच्या भावातील चढ उतार कायम राहतील. मात्र नव्या मालाची बाजारात आवक वाढल्यानंतर तुरीच्या भावावर दबाव वाढू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.  

टोमॅटो दबावात

मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. याचा परिणाम टोमॅटोच्या भावावर दिसून आला. टोमॅटोचा बाजार राज्यात मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे पुन्हा ५०० रुपयांनी कमी झाला. टोमॅटोला सध्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ७०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटोच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी वाढेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Car Blast: दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू, २४ जखमी, हाय अलर्ट जारी

Sugarcane Farming: अहिल्यानगरला चौतीस हजार हेक्टरवर ऊस लागवड

NCP Alliance Local Polls: मुश्रीफांनी 'भाजप'चा डाव ओळखला, मध्यस्थी करत दोन्ही राष्ट्रवादींना आणले एकत्र

Rabi Sowing: रब्बीची ५३ हजार ९६० हेक्टरवर पेरणी

MSP Registration: बायोमेट्रिक नोंदणीच्या नावावर शेतकऱ्यांचा नाहक छळ

SCROLL FOR NEXT