CCI Cotton Procurement : सीसीआयकडून देशात ३४ लाख कापूस गाठींची खरेदी; महाराष्ट्रातील खरेदी केवळ ५.४२ लाख गाठींवर

Cotton Market : सीसीआयने देशभरात ३४ लाख गाठी कापसाची खेरदी केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १ लाख गाठीने खरेदी जास्त झाली.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : सीसीआयने देशभरात ३४ लाख गाठी कापसाची खेरदी केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १ लाख गाठीने खरेदी जास्त झाली. गेल्या हंगामात सीसीआयने ३३ लाख गाठी कापूस खरेदी केला होता. यंदा तेलंगणात सर्वाधिक जवळपास २० लाख गाठींची खरेदी झाली. त्यानंतर महाराष्ट्रात ५.४२ लाख गाठींची खरेदी करण्यात आली. 

देशात खुल्या बाजारात कापसाचे भाव दबावात आहेत. बाजारभाव सध्या हमीभावापेक्षा कमी आहेत. केंद्र सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये हमीभाव जाहीर केला. तर लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपये हमीभाव आहे. पण खुल्या बाजारात सध्या कापसाला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. खुल्या बाजारात भाव दबावात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. 

Cotton Market
Cotton Market Rate : कापसाला देशभरात काय भाव मिळतोय? कापसाचे भाव वाढतील का?

खुल्या बाजारात कमी भावावामुळे सीसीआयची कापसाची खरेदी वेगाने सुरु आहे. त्यामुळे सीसीआयने २ महिन्यातच गेल्या हंगामात जेवढी खरेदी झाली त्यापेक्षा जास्त खरेदी केली. गेल्या हंगामात सीसीआयने ३३ लाख गाठी कापूस खरेदी केला होता. यंदाच्या हंगामात ऑक्टोबरच्या मध्यात खरेदी सुरु झाली. म्हणजे खरेदी सुरु होऊन दोन महिने झाले. या दोन महिन्यातच सीसीआयने ३४ लाख गाठींची खरेदी केली. 

तेलंगणात खरेदी आघाडीवर

देशभरात झालेल्या एकूण खरेदीत तेलंगणातच जवळपास ४१ टक्के खरेदी झाली. तेलंगणात १९ लाख ९० हजार गाठींची खरेदी झाली. तेलंगणानंतर महाराष्ट्रात केवळ ५ लाख ४२ हजार गाठींची खरेदी पूर्ण झाली. आतापर्यंत झालेल्या एकूण खरेदीच्या तुलनेत महाराष्ट्रात केवळ १६ टक्के खरेदी झाली. तर कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या गुजरातमध्ये फक्त ८८ हजार ५०६ गाठींची खरेदी करण्यात आली. 

Cotton Market
Cotton Market : कापूस बाजारात सबुरीची भूमिका गरजेची

बाजारात आवक वाढली

देशातील बाजारात आता कापसाची आवक शिगेला पोचली आहे. शनिवार आणि रविवार वगळता दैनंदीन आवक २ लाख गाठींपेक्षा जास्त होत आहे. काॅटन असिसोएशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार सोमवारी (ता.१६) देशभरातील बाजारात २ लाख १२ हजार गाठींची आवक झाली. सर्वाधिक आवक तेलंगणात सुरु आहे. तेलंगणात सोमवारीही जवळपास ६२ हजारा गाठींची आवक झाली होती. तर महाराष्ट्रातील आवक जवळपास ४७ हजार गाठींवर पोचली होती. 

बाजारभाव दबावातच

देशात यंदा उत्पादन घटले. मागणी टिकून आहे. परंतु शिगेला पोचलेली आवक, आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव यामुळे कापसाचे भाव दबावात आहेत. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. सध्या देशभरात सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हा भाव हमीभावापेक्षा किमान ५ ते ८ टक्क्यांनी कमी आहे. भाव दबावात असल्याने शेतकरी अडणीत आले आहेत.  

राज्यनिहाय सीसीआयची खरेदी ( गाठीत)
राज्य…खरेदी
तेलंगणा…१९,९०,०००
महाराष्ट्र…५,४२,०००
आंध्र प्रदेश…१,८०,०००
कर्नाटक…१,६६,०००
गुजरात…८८,५०६
मध्य प्रदेश…८६,८८२
ओडिशा…२१,१४८
राजस्थान…१३,५०७
हरियाना…५,५७६
पंजाब…२७९
पश्चिम बंगाल…२३४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com