Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : देशातील कापूस पिकाला कमी पाऊस, कीड-रोगांचा फटका

Market Bulletin : जागतिक कापूस उत्पादनात यंदा घटणार आहे. तसेच देशातही दुष्काळी स्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसेच देशाच्या काही भागांमध्ये कापसाच्या पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

Anil Jadhao 

1. सोयाबीनची भावपातळी चालू आठवड्यात काही प्रमाणात वाढली होती. सोयाबीनचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवड्यात निचांकी पातळीवर बंद झाले होते. सोयाबीन वायदे १३.०५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे भाव ३९५ डाॅलरवर पोचले होते. देशातील बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशातील सोयाबीन पिकाची स्थिती, खाद्यतेल आयातीचे प्रमाण आणि उद्योगांची मागणी पाहता सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस स्थिर राहतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

2. राज्यातील बाजारात सध्या काकडीचे भाव स्थिर आहेत. काकडीची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून वाढलेली दिसते. तर काकडीचा उठाव मात्र स्थिर आहे. त्यामुळे काकडीच्या भागात मागील काही दिवसांमध्ये नरमाई आली होती. सध्या काकडीला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांचा भाव मिळतो आहे. काकडीचा भाव पुढील काही दिवस दबावातच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.  

3. आल्याच्या भावातील तेजी मागील काही दिवसांपासून थांबलेली आहे. आल्याची खरेदी काहीशी मंदावली आहे. सध्या आल्याचे भाव प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. परंतु आल्याचे दर कमी होणार नाहीत. आल्यातील तेजी पुढील काळातही टिकून राहील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

4. सध्या गवारीचे भाव स्थिरावले आहेत. बाजारात गवारीची आवक मागील काही दिवसांपासून किंचित वाढलेली दिसते. तर गवारीचा उठाव स्थिर आहे. त्यामुळे गवारीचे भाव  वाढताना दिसत नाहीत. सध्या बाजारात गवारीला सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहेत. गवारीची ही भावपातळी पुढील काही दिवस कायम राहू शकते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

5. अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने मागील तीन महिन्यांमध्ये सातत्याने जागतिक कापूस उत्पादन, अमेरिका आणि भारताच्या कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज दिला. सप्टेंबरच्या अहवालातही मागील महिन्यातील अंदाजापेक्षा कमी उत्पादन राहील, असे म्हटले आहे. ताज्या अहवालात अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा ६ टक्क्यांनी घटेल असे म्हटले आहे. तर ऑगस्ट महिन्यातील अंदाजाच्या तुलनेत सप्टेंबरमधील अंदाजात अमेरिका आणि भारतातील उत्पादन आणखी कमी करण्यात आले आहे. यंदा भारतातील महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये पावसाने दडी मारली. तसेच देशातील कापूस लागवड यंदा सव्वातीन टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे सहाजिकच देशातील कापूस उत्पादन कमी राहील, असा अंदाज आहे. पण चालू महिन्यातील अंदाज ३२० लाख गाठींपर्यंत कमी करण्यात आला. याच युएसडीएनं मागील खरिपातील उत्पादन ३३२ लाख गाठींवर स्थिरावल्याचं म्हटलं आहे.

मध्य भारत आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे उत्पादकता घटत आहे. तर उत्तर भारतासह देशभरात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या येत आहेत. सध्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचं प्रमाण कमी असलं तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमध्ये ही समस्या जास्त आहे. एकूणच काय तर देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कापूस उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ८ हजार रूपये भाव मिळत आहे. कापसाचे हे भाव आणखी काही दिवस पाहायला मिळतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT