Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंधाची वाढवली मुदत

Anil Jadhao 

1. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात वाढ झाली. खूप दिवसांनी आज सोयाबीनने १३ डाॅलरचा टप्पा पार केला. तर सोयापेंडने ४०० डाॅलरची पातळी ओेलांडली. देशातील भावही आज क्विंटलमागं ५० रुपयांनी वाढले होते. सोयाबीनची दरपातळी आज सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीनच्या दरात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

   
2. कापसाच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत नरमाई दिसून आली. कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८४ सेंटपर्यंत नरमले होते. तर देशातील कापूस वायदे ५८ हजार २०० रुपायांवर आले होते. कापसाच्या वायद्यांमध्ये मागील तीन आठवड्यांपासून सतत चढ उतार दिसून येत आहेत. तर बाजार समित्यांमधील भावपातळी ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. कापसाच्या दरातील चढ उतार पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

3. देशातील बाजारात कांद्याचे भाव काहिसे वाढले आहेत. सध्या बाजारातील कांदा आवक सरासरीच्या तुलनेत कमी झाली आहे. परिणामी कांद्याच्या भावात सुधारणा झाली. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजारांचा भाव मिळत आहे. यापुढील काळात कांद्याची आवक आणखी कमी होत जाऊन दरात सुधारणाही होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

4. आल्याच्या भावातील तेजी मागील काही दिवसांपासून थांबलेली आहे. आल्याची खरेदी काहीशी मंदावली आहे. सध्या आल्याचे भाव प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. परंतु आल्याचे दर कमी होणार नाहीत. आल्यातील तेजी पुढील काळातही टिकून राहील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

5. देशात सध्या साखरेचे भाव वाढले आहेत. केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेच्या भावात तेजी आली. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव गेल्या १२ वर्षांमधील उच्चांकी पातळीवर आहेत. सणांच्या काळात देशात साखरेला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. परिणामी साखरेचे भाव आणखी वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे सणांच्या काळात भाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आज म्हणजेच सरकारने साखर निर्यातीवरील निर्बंध पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवले.आता सगळ्यांना माहीत आहेच की केंद्राने ३१ ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लादले होते. त्याला आता अनिश्चित काळासाठी मुदतवाढ मिळाली.

केंद्राने कच्ची साखर, पांढरी साखर, रिफाईंड साखर आणि सेंद्रीय साखरेच्या निर्यातीवरील निर्बंधांना मुदतवाढ दिली. साखरेचे घाऊक भाव सध्या ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. केंद्र सरकराने ऑक्टोबर महिन्यासाठी पुन्हा १५ लाख टनांचा दुसरा टप्प्यातील कोटा जाहीर केला. आधी १३ लाख टनांचा कोटा जाहीर केला होता. दोन्ही टप्प्यांतील एकत्रित कोटा २८ लाख टन इतका झाला आहे. गेल्या काही महिन्यांचा विचार करता हा कोटा सर्वाधिक आहे. यंदाही देशातील साखर उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साखरेच्या दरातील वाढ कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT