Tur Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीची आवक पुढील महिन्यापासून आणखी वाढण्याची शक्यता

Team Agrowon

Market Bulletin : सोयाबीनच्या वायद्यांमध्ये मागील आठवडाभर चढ उतार दिसले. तर आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनचे वायदे काहीसे वाढीसह १३.१६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडचे वायदे ४०६ डाॅलरवर बंद झाले.

मागील दोन दिवसांमध्ये काहीशी घट झाली होती. त्याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसला. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनच्या बाजारात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाच्या वायद्यांमध्ये देशात शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी काहीशी सुधारणा झाली होती. वायदे ५६ हजार ६८० रुपयांवर बंद झाले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांनी ८० सेंटपेक्षा कमी पातळी पुन्हा गाठली होती. वायदे ७९.९० सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम दिसते.

देशात यंदा उत्पादन घटले तरी मागणीच्या बाजुनेही काही अडचणी आहेत. पण आता मागणीच्या बाजुनेही काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत. तरीही बाजारातील आवक आणि आवकेचा कालावधी पाहता दरात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरु झाली आहे. यंदा लागवड कमी आहे. त्यातच तूर पिकाच्या वाढीला कमी पावसाचा फटका बसला होता. त्यातच अवकाळी पावसाने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात नुकसान झाले. या सर्व कारणांनी तुरीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

पण सध्या बाजारात नवा माल दाखल होण्याला सुरुवात झाली. आवक पुढील महिन्यात आणखी वाढेल यामुळे दरात काहीशी नरमाई आली आहे. सध्या सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. आवकेचा दबाव असेपर्यंत तुरीच्या भावावरही काहीसा दबाव येऊ शकतो, असा अंदाज आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून केळीचे भाव नरमलेले दिसतात. आंध्र प्रदेश आणि इतर काही भागातून केळीची आवक सुरू झाली आहे. ही आवक चांगलीच वाढल्याने राज्याच्या केळीला स्पर्धा निर्माण झाली. याचा दरांवर परिणाम झाला आहे. राज्यात काही दिवसांपुर्वी केळी कमाल १ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दर होता.

पण केळी दरात मागील काही दिवसांत घट झाली. केळीला आता गुणवत्तेप्रमाणे सरासरी ९०० ते १२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यावल आणि काही भागात भाव १९०० रुपयांपर्यंतही दिसतो. केळीचा हा भाव काहीसा वाढू शकतो, असा अंदाज आहे.

सरकारने गहू साठा मर्यादा कमी केल्याचा बाजारावर परिणाम कायम आहे. यावेळी सरकारला गव्हाचे भाव कमी करण्यास यश मिळाले. बाजारावरील फास जास्त आवळल्याने दर कमी झाले आहेत. गव्हाचे भाव जवळपास १०० ते २०० रुपयाने मागील दोन आठवड्यांपासून कमी झाले. सरकारच्या लिलावातही भाव नरमल्याचाही परिणाम बाजारावर दिसून येत आहे.

कारण साठ्याची मर्यादा केमी केल्याने गहू लगेच बाजारात विकावा लागत आहे. यामुळे गव्हाचा भाव २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दिसतो आहे. गव्हाच्या बाजारावरील दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असे गहू बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT