Banana Market : खानदेशात केळीची आवक घटली

Banana Market Update : खानदेशात केळीची आवक घटली असून, सध्या प्रतिदिन ४० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.
Banana Market
Banana MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात केळीची आवक घटली असून, सध्या प्रतिदिन ४० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. दर किमान १९२५ ते कमाल २०५०, २०६० रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे.

चोपडा, जळगाव व रावेर बाजार समित्या जे दर जाहीर करीत आहेत, त्या दरात सध्या खरेदी केली जात नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांत नाराजी आहे. काही भागात १०००, १२०० ते १६२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत सध्या १२२५ ते १४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

Banana Market
Banana Disease : जळगावात केळीवर करप्याचा फैलाव

तेथे आवक कमी असूनही दर हवे तसे नाहीत. यामुळे खानदेशातील केळीची मध्य प्रदेशातील पाठवणूक सध्या कमी झाली आहे. कांदेबाग (मागील ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या बागा) केळीची काढणी ८० टक्के पूर्ण झाली आहे. उशिराच्या बागांमध्ये सध्या काढणी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, जळगाव पाचोरा-भडगाव भागात सध्या केळीची आवक होत आहे.

धुळ्यातील शिरपुरातही केळीची आवक नगण्य किंवा अल्प आहे. नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागातही केळीची आवक सुरू झालेली नाही. केळीची आवक मागील महिन्याच्या अखेरीस ५१ ट्रक प्रतिदिन अशी खानदेशात होती.

त्यात १० ते ११ ट्रकने घट झाली आहे. परंतु दरात मात्र फारशी वाढ झालेली नाही. दर स्थिर आहेत. परंतु जळगाव जिल्ह्यात कमी दरात केळी खरेदीचे प्रकारही सुरू झाले असून, याबाबत कारवाईची मागणीही केली जात आहे.

Banana Market
Banana Disease : या लक्षणांवरुन ओळखा केळीतील करपा रोग

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही मागील सात ते आठ दिवसात प्रतिदिन सरासरी ११ ट्रक केळीची आवक झाली आहे. मध्य प्रदेशात केळीची अल्प आवक आहे. खानदेशातील केळीला उत्तरेकडील दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर पदेश, काश्मीर येथे उठाव आहे.

तसेच राज्यात नागपूर, ठाणे, मुंबई येथेही केळीची पाठवणूक होत आहे. उत्तर भारतात आंध्र प्रदेशातून केळीची आवक वाढल्याने खानदेशातील केळीची मागमी कमी होऊ लागली आहे. यामुळे आवक कमी असूनही दरात फारशी वाढ होत नसल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com