Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : साखरेचे भाव १२ वर्षातील उच्चांकी पातळीवर

Market Bulletin : यंदा जागतिक साखर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचे भाव १२ वर्षातील उच्चांकी पातळीवर आहेत.

Anil Jadhao 

1. देशातील बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये नरमाई दिसून आली. वायदे आज दुपारपर्यंत २०० रुपयांनी नरमले. वायदे दुपारपर्यंत ५९ हजार ८०० रुपयांवर आले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे वाढून ८७ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. देशातील बाजार समित्यांमधील भावपातळी कायम आहे. कापूस आजही ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान विकला गेला. कापसाची ही दरपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

2. देशात सोयाबीनचे भाव स्थिर असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र भावात काहिशी वाढ झाली. देशात सोयाबीन ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जाते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे १२.८६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे भाव ३७९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात आणखी काही दिवस सोयाबीनची भावपातळी कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

3. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव सुरु झाले तरी दरावरील दबाव कायम आहे. कांद्याला सध्या प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ७०० ते २ हजारांचा भाव मिळत आहे. बाजारातील कांदा आवकही कमीच आहे. तसेच चाळीतील कांद्याचे प्रमाणही कमी असून कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुढील काळात कांद्याचे बाजारभाव सुधारण्याचा अंदाज आहे, असा अभ्यासकांनी सांगितले.

4. देशातील बाजारात सध्या गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा तुटवडा जाणवत आहे. राज्याचा विचार करता डाळिंबावर मोठ्या प्रमाणात तेलकट डाग रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. यामुळे गुणवत्तापूर्ण माल कमी आहे. सध्या गुणवत्तापूर्ण मालाला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजारांचा भाव मिळत आहे. तर सरासरी भावपातळी ६ हजार ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. डाळिंबाचे हे भाव टिकून राहू शकतात, अशा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

5. यंदा जागतिक साखर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचे भाव १२ वर्षातील उच्चांकी पातळीवर आहेत. यंदा भारत आणि थायलंडमध्येही साखर उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. जगात ब्राझील, भारत आणि थायलंड हे तीन देश साखर उत्पादनात आघाडीवर आहेत. पण यंदा भारत आणि थायलंडमध्ये कमी पाऊस आणि दुष्काळी स्थितीमुळे साखर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. केवळ ब्राझीलमध्येच यंदा साखर उत्पादनात काहिशी वाढ होण्याची अंदाज आहे. पण एकूणच जागतिक साखर उत्पादनच कमी राहण्याचा अंदाज असून साखरेच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. पण या तेजीचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना कमीच होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने साखर निर्यातीचा कोटा जाहीर केलेला नाही. तसेच यंदा देशातील ऊस उत्पादनाची स्थिती पाहता, सरकार साखर निर्यातीचा कोटा वाढवून देण्याची शक्यता दिसत नाही. उलट साखरेचे भाव सुधारल्यास केंद्र सरकार साखर निर्यातीवर बंदी घालू शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. 

सध्या आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या व पांढऱ्या साखरेला प्रति टन ५२००० रुपयांवर दर आहेत. तर रिफाईंड साखरेचे दर ६०००० रुपये टनाच्या आसपास आहेत. तर देशात सध्या साखरेला सरासरी ४० हजार ते ४३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. देशातील भाव पुढील काळातही टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nilanga Crop Competition Winners: निलंग्यात पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

Farm Loan Waiver Benefits: पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

Nashik Annual Credit Plan: नाशिक जिल्ह्यासाठी ६० हजार ५७५ कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर

Fruit Crop Insurance Scheme: फळपीक विमा योजनेच्या अर्जास प्रारंभ

NAFED Onion Procurement: कांदा खरेदीसाठी ‘नाफेड’ने जनजागृती करावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

SCROLL FOR NEXT