Agrowon Podcast
Agrowon Podcast Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : जागतिक बाजारात सोयाबीन दर तेजीत

Anil Jadhao 

१) कापूस दर स्थिरावले (Cotton rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापूस दरातील चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाचे भाव नरमले होते. कापसाचे वायदे ८२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील बाजारातील दर स्थिर होते.

कापसाला आज सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपये भाव मिळाला. सध्या बाजारातील आवक वाढली. त्यातच गरज असलेले शेतकरी मार्च महिन्यात कापूस विकतील, याची जाणीव असल्याने कापसाचे भाव दबावात आहेत.

पण पुढील काळात कापूस दर सुधारतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) तुरीची आवक कमीच (Tur Rate)

सध्या तूर दरातील तेजी कायम असून बाजारातील आवकही वाढलेली नाही. यंदा तुरीचे उत्पादन घटल्याने दर चांगले राहतील, याची माहिती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळं शेतकरी तुरीची लगेच विक्री करताना दिसत नाहीत.

त्यामुळे सध्या तुरीला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. व्यापारी कमी खरेदी करत असले तरी आवकही कमी असल्याने दर तेजीत आहेत. तुरीचे दर यंदा तेजीतच राहतील, असा अंदाजही व्यापारी व्यक्त करत आहेत.

३) हरभऱ्याला आधार मिळणार (Chana Market)

रब्बीतील हरभरा आता बाजारात दाखल होतोय. अद्याप बाजारात आवकेचा दबाव नाही. मात्र तरीही हरभरा दर दबावात आहेत. नाफेडची नोंदणी सध्या सुरु आहे. खरेदी पुढील आठवड्यापासून सुरु होईल.

यंदा हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या बाजारात ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळतोय. पण उष्णता तसेच पावसामुळे नुकसान होत आहे.

त्यामुळं नाफेडची खरेदी सुरु झाल्यानंतर हरभरा दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

४) मका दर टिकून (Maize Rate)

सध्या बाजारातील मका आवक कमी झाली. रब्बी हंगामातील आवक महिनाभरात वाढेल. रब्बी हंगामात चांगले उत्पादन राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तुटवडा असल्याने भारतातून निर्यात वाढली.

त्यामुळं मक्याचे भाव हमीभावापेक्षा कमी होण्याची शक्यता कमीच आहे. सध्या मक्याला सरासरी २ हजार ५० ते २ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. आवकेच्या हंगामातही हाच भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) सोयाबीनचे दर वाढतील का? (Soybean Rate)

अर्जेंटीनातील उत्पादन घट आणि ब्राझीलमधील विक्रमी उत्पादन यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार दिसत आहेत. पण सरासरी दरपातळी टिकून आहे. सोयाबीनला १५ डाॅलर प्रतिबुशेल्सच्यावर आधार मिळतोय.

तर सोयापेंड ४९० डाॅलरपेक्षा अधिक राहतेय. ब्राझीलमध्ये सध्या सोयाबीन काढणी सुरु आहे. पण पावसामुळे काढणीच्या कामात व्यत्यय येतोय. त्यामुळे काढणीची गती यंदा कमी आहे. त्यातच ब्राझीलमधील शेतकरी चांगल्या दराची चाचपणी करताना दिसत आहेत.

येथील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन विक्री काहीशी कमी केलेली दिसते. चीन यंदा सोयाबीन आयात वाढविणार आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर तेजीत राहण्यास अनुकूल स्थिती आहे. भारतातूनही सोयापेंड निर्यात वेगाने सुरु आहे. त्यामुळं सोयाबीनला मागणी आहे.

पण मार्च महिन्यातील व्यवहार आणि शेतकऱ्यांची वाढलेली विक्री, यामुळं दर दबावात आहेत. सध्या सोयाबीनला देशात सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळतोय. पण सोयाबीनचे दर सुधारु शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पॅनिक सेलिंग टाळावे.

शेतकऱ्यांनी किमान ५ हजार ५०० रुपयांचे टार्गेट ठेवण्यास हरकत नाही. तर चालू हंगामात सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT