
Onion Market Update : गेल्या काही दिवसांपासून लेट खरीप कांद्याच्या दरात (Onion Rate) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक (Onion Producer Farmer) शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बाजार समित्यांमध्ये नाफेडमार्फत (NAFED) सुरू करण्याची घोषणा केली आहे.
कांद्याच्या दराचा प्रश्न विरोधकांनी सभागृहात लावून धरला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कांदाप्रश्नी तातडीची बैठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे.
लाल कांद्याच्या दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
कांदाच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा रोष पाहता भुसे यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.
कालच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही बैठक घेतली होती. परंतु बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या बैठकीत तरी काही तोडगा निघणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दिवसेंदिवस कांद्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. भारती पवार यांनीही नाफेडच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत कांद्याला हमीभाव देणे अशक्य असल्याचे पवार यांनी म्हटले होते.
नाफेडमार्फत होत असलेल्या खरेदीबाबतही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. नाफेडच्या खरेदीत पारदर्शकता नसल्याचा आऱोप शेतकऱ्यांकडून यावेळी करण्यात आला. त्यामुळे कालच्या पवार यांच्या बैठकीत कांदाप्रश्नी तोडगा निघाला नव्हता.
दरम्यान, कांदाप्रश्नी इतर उपाययोजना करण्याऐवजी हमीभावाची मागणी प्रामुख्याने शेतकऱ्यांनी बैठकीत केली. तसेच नाफेडकडून होणारी कांदा खरेदी ही शेतकरी कंपन्यांऐवजी नाफेडने केली तरच कांद्याला भाव मिळू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र, नाफेडकडून होणारी कांदा ही शेतकरी कंपन्यांमार्फतच होईल, असे उत्तर पवार यांनी दिल्याने शेतकरी नाराज आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.