Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनचा बाजार मंदीतच; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत तूर दर ?

Daily Commodity Rates : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, तूर आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन मंदीतच

सोयाबीनचे भाव कमीच आहेत. सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा किमान ८०० रुपयांनी कमी आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच आडचणीत आले. आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ३ हजार ८०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या भावामध्ये चढ उतार सुरुच आहेत.

जागतिक उत्पादनात झालेल्या वाढीचा परिणाम सोयाबीनच्या भावावर दिसत आहेत. सीबाॅटवरील वायद्यांमध्ये सोयाबीनचा भाव आज ९.७५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस दबावातच

देशातील बाजारात यंदा घटलेले उत्पादन, चांगली मागणी आणि कापड निर्यातील मिळत असलेला आधार यामुळे कापूस भावाला सपोर्ट आहे. मात्र आवकेचा दबाव असल्याने कापूस भाव दबावातच आहेत. बाजारात रोज २ लाख गाठींपेक्षा अधिकची आवक होत आहे.

तर कापसाचा भाव सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दबावात असून आज ६९ सेंट प्रतिपाऊंडवर भावपातळी होती. कापसाच्या भावात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा नरमला

खरिप कांद्याची आवक वाढल्यानंतर कांदाच्या भावातील तेजी विरली आहे. कांद्याच्या भावात आठवडाभरातच ५५ टक्क्यांपर्यंत घट झाली होती. कमी दिवसात एवढी घट झाल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले. मात्र सरकार अद्यापही २० टक्के निर्यात शुल्क काढण्याचे नाव घईना. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

बाजारात कांद्याला आज सरासरी १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. पुढील दोन आठवड्यांनंतर देशभरातील कांदा आवक आणखी सुधारू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीचे भाव नरमले

नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरु झाली. सध्या नव्या तुरीची आवक खूपच आहे. आवकेचा दबाव वाढण्यासाठी किमान एक महिना लागेल. परंतु नवा माल बाजारात येण्याच्या सेंटीमेंटमुळे दरात नरमाई आली आहे.

देशातील बाजारात सध्या तुरीला ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीला उठाव चांगला आहे. तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे. पुढील काही आठवड्यानंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

आले भाव पडले

आल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून दबावात आले आहेत. नव्या मालाची आवक सुरु झाल्यानंतर दर कमी झाले आहेत. यंदा राज्यात यंदा आले पिकाचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे आले उत्पादनात यंदा वाढ होईल, असा अंदाज आधिपासून व्यक्त केला जात होता.

बाजारातील आवक वाढल्यानंतर दरावर दबाव वाढत गेला. सध्या आल्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ६ हजारांचा भाव मिळत आहे. आल्याच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Model Village: या गावाला शाब्बासकी हवीच!

Election Commission : ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

Panchayati Raj : स्वातंत्र्यानंतर पंचायती राज व्यवस्थेचा विकास

Seed Bill 2025 : कृषी मंत्रालयाने नवीन बियाणे विधेयकाचा मसुदा केला जारी; ११ डिसेंबरपर्यंत सूचना पाठवता येणार

Bihar Election Results 2025: बिहारमध्ये 'एनडीए' द्विशतकाच्या दिशेने, सर्वात मोठा पक्ष कोणता?; RJD ला धक्का

SCROLL FOR NEXT