Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा भावात काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच सध्याचे हरभरा भाव काय आहेत?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हरभरा आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील काहीशी सुधारणा दिसून आली. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.०७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही भाव आज कायम होते. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव ४ हजार ४५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजारात सोयाबीनची खरेदी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सुरु होती. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूसात काहीशी वाढ

कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहेत. कापसाचे वायदे कालच्या तुलनेत आज काहीसे वाढले होते. परंतु भावपातळी आजही ७० सेंटपेक्षा कमी होती. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६९.६५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील नोव्हेंबरचे वायदे काहीसे कमी होऊन ५७ हजार ५०० हजार रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापूस आवक नगण्य पातळीवर पोचली आहे. तरीही कापसाचे भाव  ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा

कांद्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी वाढ झाली आहे. नाफेडने बाजारात कांद्याची विक्री सुरु केल्यानंतर कांद्याच्या भावात नरमाई आली होती. मात्र बाजारात पुरवठाच कमी असल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली. कांदा मार्केट ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान होते. बाजारातील कांदा आवक कमी आहे. तसेच नाफेडकडील स्टाॅकही मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे बाजाराला आधार मिळाला. कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हरभऱ्यातील तेजी कायम

हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे. देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला आहे. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्टाॅकिस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयात मालही येत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.  

तुरीचा भाव स्थिरावला

तुरीचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. तुरीला वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाला होता. तसेच आयातही सुरु आहे. याचा दबाव दरावर आला. पण भाव १० हजारांच्या दरम्यान राहीले होते. मात्र सणांची मागणी वाढल्याने तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. तुरीचा सरासरी भाव १० हजार ते १० हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तुरीच्या भावात पुढच्या काळातही काही प्रमाणात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT