Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : वायद्यांमध्ये कापसात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत आजचे गहू दर?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, मका, गहू आणि हिरवी मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे भाव आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांनी १०.१९ डाॅलर डाॅलर प्रतिबुशेल्सची पातळी गाठली. तर सोयापेंडचे भाव वाठून वायदे २९९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात काहिशी सुधारणा

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ७०.६० सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्ये काहिसे चढ उतार सुरु आहेत. जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला ५६ हजार ९५० रुपयाने व्यवहार झाले. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मका नरमला

मक्याच्या बाजारात मागील ३ दिवसांपासून नरमाई दिसून आली. दिवाळीनंतर बाजारात मक्याची आवक वाढत आहे. तसेच मक्यामध्ये ओलावा देखील जास्त दिसत आहे. परिणामी दिवाळीनंतर बाजारात भाव कमी झाल्याचे दिसत आहे. मका सध्या बाजारात १६०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर बाजारातील आवक यापुढच्या काळात आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण मक्याला मागणी असल्याने आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर मका दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

हिरवी मिरची टिकून

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव टिकून आहेत. बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहिशी वाढलेली दिसते. पण बाजारात मागणीही चांगली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे. बाजारात मिरचीचे भाव सध्या ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

गव्हाचे भाव तेजीतच

देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. गव्हाला सध्या सणांची मागणी आहे. गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते. तसेच सरकारडे गव्हाचा स्टाॅक कमी आहे. बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे. त्यामुळे गव्हाचे भाव स्थिर आहेत. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. ऐन रब्बी पेरणीच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT