Market Bulletin Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा व्यवहार पूर्ववत होऊनही दर दबावातच

Market Bulletin : देशाचे कांदा हब असलेल्या नाशिक जिल्ह्यात लिलाव सुरु झाले. पण पहिल्या दिवशी बाजारातील आवक कमीच होती. तर दरही दबावातच दिसले.

Anil Jadhao 

1.  देशातील बाजारात सोयाबीनची भावपातळी सध्या दबावातच आहे. काही बाजारात नवे सोयाबीन येत आहे. पण त्याचे प्रमाण कमीच आहे. तर भावपातळी सध्या सरासरी प्रति क्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार रूपयांच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन दरात चढ-उतार सुरु आहेत. देशातील सोयाबीनची भावपातळी आणखी काही दिवस या पातळीला राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

2. देशात आता नव्या कापसाची आवक काही प्रमाणात वाढत आहे. कापूस बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे. कापसाला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ८ हजार रूपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील भावपातळी काहिशी स्थिर दिसतेय. देशात यंदा कापूस उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कापसाच्या भावाला आधार मिळू शकतो, असे अभ्यासकांनी सांगितले.

3. राज्यातील बाजारात कारल्याची आवक स्थिर आहे. कारल्याला चांगला उठाव मिळत आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसून येत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे बाजारातील आवकही मर्यादीत दिसतेय. सध्या कारल्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. कारल्याचे भाव आणखी काही दिवस टिकून राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

4. बाजारातील टोमॅटो आवक काहीशी कमी होऊनही दरावरील दबाव कायम आहे. टोमॅटोचे भाव मागील महिनाभरापासून उत्पादन खर्चापेक्षा कमीच आहेत. सध्या बाजारात टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ४०० ते ७०० रुपयांचा भाव मिळतोय. सध्याची भावपातळी उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. टोमॅटोचे भाव पुढील काही दिवसांमध्ये काही प्रमाणात सुधारु शकतात, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

5. देशाचे कांदा हब असलेल्या नाशिक जिल्ह्यात लिलाव सुरु झाले. पण पहिल्या दिवशी बाजारातील आवक कमीच होती. तर दरही दबावातच दिसले. व्यापाऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्यांसाठी तब्बल १३ दिवस कांदा लिलाव बंद ठेवले होते. नेमकं याच काळात कधी पाऊस तर कधी ऊन, ढगाळ वातावरण होते. वातावरण सातत्याने बदल होत असल्याने चाळीत कांदा खराब होण्याचं प्रमाण वाढलं होतं. पण लिलावही बंद होते. यामुळं शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. तर काही व्यापाऱ्यांनी बाजार समितीबाहेर कांद्याचे व्यवहार सुरु ठेवले होते. पण भाव पाडून खरेदी सुरु होती. बुधवारी व्यापाऱ्यांनी लिलाव सुरु केले. पण बाजारात आवकही कमी होती. तर कांद्याला भावही कमीच मिळाला.

बाजारात कांदा सध्या १ हजार ७०० ते १ हजार ९०० रुपये दराने विकला जात आहे. सरकारने अद्यापही कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क काढले नाही. तसेच ऐन सणासुदीच्या काळात सरकार कांद्याचे भाव कमी करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे. पण सध्या देशात उन्हाळ कांद्याची उपलब्धता कमी आहे. तर खरिपातील लागवडीही यंदा घटलेल्या आहेत. त्यातच कमी पावसाचा फटकाही पिकाला बसत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता नाही, असेही अभ्यासकांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

Maharashtra Farmer Crisis: अतिवृष्टी, महापुरात शेतकरी उघड्यावर

Agriculture Livestock Scheme: गाई-म्हशीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारची योजना

Water Management: धरण व्यवस्थापन संहिता

Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात

SCROLL FOR NEXT