Soybean Market: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमले; दरात मोठे चढ उतार !

Soybean Rate : सोयाबीन बाजारात आज मोठे चढ उतार दिसून यते आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वायद्यांमध्ये मोठी घट झाली. सोयाबीनचे वायदे आज १३ डाॅलरच्या खाली गेले होते. तर देशातील बाजारातही क्विंटलमागं ५० रुपयांची नरमाई दिसून आली.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on


Soybean : पुणेः सोयाबीन बाजारात आज मोठे चढ उतार दिसून यते आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वायद्यांमध्ये मोठी घट झाली. सोयाबीनचे वायदे आज १३ डाॅलरच्या खाली गेले होते. तर देशातील बाजारातही क्विंटलमागं ५० रुपयांची नरमाई दिसून आली. तर दुसरीकडे सोयाबीनची लागवड ४ टक्क्यांनी वाढली. पण पावसातील खंडाचा सोयाबीन पिकावर परिणाम होताना दिसत आहे.  

आज सोयाबीन दरात मोठे चढ उतार पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वायदे आज दुपारी गेल्या दीड महिन्यातील निचांकी पातळीवर पोचले होते. काल बाजार १३.०४ डाॅलरवर बंद झाला होता. आज  बाजार सुरु झाला तेव्हा सुरुवातीच्या काही सत्रांमध्ये वायदे सुधारले. पण नंतर दरात सतत घट होत गेली. दुपारी वायदे एक टक्क्याने कमी होऊन १२.९२ डाॅलरपर्यंत कमी झाले होते. सोयापेंडचे वायेदही काहीसे वाढून ३९२ डाॅलरवर होते.

जगातील दोन नंबरच्या सोयाबीन उत्पादक अमेरिकेत पाऊस नव्हता. अमेरिकेतील बहुतांशी सोयाबीन पीक फुलोऱ्यात आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. पण अनेक भागात काही दिवस पाऊस नव्हता. पाऊस नसल्याने पिकावर परिणाम झाला. काही भागांमध्ये उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. पण सोमवारी अमेरिकेतील अनेक भागात पाऊस झाला. हा पाऊस सर्वदूर जोरदार नव्हता. पण अनेक भागात पाऊस झाल्याने याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे.

खाद्येतलाच्या वायद्यांमध्येही चढ उतार सुरु आहेत. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून येत आहे. सोयातेल आणि पामतेलाच्या भावात नरमाई दिसून आली. दुसरीकडे चीनची सोयाबीन आयात मागील महिनाभरात कमी झाली. जुलै महिन्यात जूनच्या तुलनेत चीनची सोयाबीन आयात साडेपाच टक्क्यांनी घटली आहे. याचाही परिणाम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारावर दिसून येत आहे.

Soybean Market
Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनमध्ये मोठे चढ उतार

देशातील बाजारभाव
देशातील बाजारातही सोयाबीन दरात क्विंटलमागं २५ ते ५० रुपयांची नरमाई दिसून आली. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी दरात कपात केली होती. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपयांचा भाव मिळाला. देशात सोयाबीन शिल्लक साठा यंदा जास्त आहे.  त्यामुळे बाजारात खरेदीही सावधगिरीने सुरु असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

लागवडीचं चित्र
चालू हंगामाचा विचार करता, आतापर्यंत सोयाबीनची लागवड गेल्यावर्षीपेक्षा वाढली. सोयाबीन लागवडीत आतापर्यंत ४ टक्क्यांची वाढ झाली. सोयाबीनखाली आतापर्यंत १२२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी याच काळात ११७ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. यंदा सोयाबीन लागवड वाढली मात्र पावसानं चिंता वाढवली. अनेक भागातील पिकाला पावसाचा ताण बसत आहे. त्यामुळं लागवड वाढली तरी उत्पादन वाढेलच याविषयी आताच सांगता येणार नाही. पण सध्या शिल्लक साठा जास्त असल्यानं सोयाबीन दरात फार मोठ्या तेजीची शक्यता सध्यातरी दिसत नाही, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com