Anil Jadhao
हिरव्या मिरचीची आवक सध्या वाढत आहे. बाजारात हिरव्या मिरचीची रोजची उलाढाल वाढल्याने दरावर काहीसा दबाव आलाय.
मिरचीचे दर मागील महिन्याच्या तुलनेत क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयाने नरमले आहेत.
सध्या हिरव्या मिरचीला २ हजार ७०० ते ३ हजार ३०० रुपये क्विंटल दर मिळतोय. हिरव्या मिरचीचा हा दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.
हिरव्या मिरचीचे पीक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. सध्या उशीरा लागवड झालेल्या पिकाची काढणी सुरु आहे.
यंदा मिरची पिकाला पावसाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे.
सध्या हिरव्या मिरचीला मागणी चांगली आहे. पुढील काळात लग्नसराई, समारंभ आणि हाॅटेल्समधून मागणी वाढेल. त्याचे नियोजन करून शेतकरी पीक घेत आहेत.