Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्याच्या दरात सुधारणा; कापूस, सोयाबीन, मका, तसेच काय आहेत कांदा दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, मका, कांदा आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीनचे भाव आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये पुन्हा १० डाॅलरवर पोचले. वायद्यांनी १०.०९ डाॅलर प्रतिबुशेल्सची पातळी गाठली. तर सोयापेंडचे भाव वाठून वायदे ३०० डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात काहिशी सुधारणा

कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ७०.२३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे आज काहीसे कमी झाले होते. देशातील वायद्यांमध्ये कापूस काहिसा वाढून ५५ हजार ५१० रुपये प्रतिखंडीवर होता. देशात कापसाचा सरासरी भाव आज ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मका नरमला

मक्याच्या बाजारात मागील ३ दिवसांपासून नरमाई दिसून आली. दिवाळीनंतर बाजारात मक्याची आवक वाढत आहे. तसेच मक्यामध्ये ओलावा देखील जास्त दिसत आहे. परिणामी दिवाळीनंतर बाजारात भाव कमी झाल्याचे दिसत आहे. मका सध्या बाजारात १६०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर बाजारातील आवक यापुढच्या काळात आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण मक्याला मागणी असल्याने आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर मका दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

कांदा दरात सुधारणा

दिवाळीनंतर कांदा बाजारात आवक कमी झाली आहे. तर लाल कांद्याची आवकही यंदा उशीरा होणार आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत कांदा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांकडील मालही संपत आला आहे. व्यापाऱ्यांकडे सध्या जास्त माल असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात चांगली सुधारणा झाली. कांदा आजही सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला गेला. पुढील काही दिवस कांद्याचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

ज्वारीचा बाजार दबावातच

देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमलेले आहेत. ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता खरिपातील ज्वारीही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे. दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT