Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्याच्या भावात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत ज्वारीचे दर?

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये घट

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील नरमाई घट कायम आहे. सोयाबीनसह सोयापेंडचे भाव कमी झाले. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन १०.२३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहिशी नरमाई आली होती. बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात नरमाई

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज भाव काहिसे कमी झाले होते तर देशातील बाजारात भाव स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कमी होऊन वायदे ७२.७२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५६ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्याचे भाव नरमले

कांद्याच्या भावातील चढ उतार कायम दिसून येत आहेत. वाढलेल्या भावात कांद्याला उठाव कमी दिसत आहे. तर भाव कमी झाल्यानंतर कांद्याची बाजारातील आवक कमी होत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात चढ उतार दिसत आहेत. कालच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात काहिशी नरमाई आली होती. कांद्याचे भाव आज ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारीचा बाजार दबावातच

देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमलेले आहेत. ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता खरिपातील ज्वारीही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे. दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

हिरवी मिरची टिकून

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव टिकून आहेत. बाजारात हिरव्या मिरचीची आवक काहिशी वाढलेली दिसते. पण बाजारात मागणीही चांगली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे. बाजारात मिरचीचे भाव सध्या ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहिशी वाढू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT