Agrowon Podcast : टोमॅटोच्या दरातील सुधारणा कायम; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहेत टोमॅटो दर

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, टोमॅटो आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Market Update
Market UpdateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम होती. सोयाबीनसह सोयापेंडचे भाव काहीसे नरमले होते. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन १०.३० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहिशी नरमाई आली होती. बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.

कापसात काहिशी वाढ

कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज भाव काहिसे वाढले होते तर देशातील बाजारात नरमाई दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी दुपारपर्यंत कमी होऊन वायदे ७३.७४ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५६ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

Market Update
Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

कांद्यात चढ उतार

कांद्याच्या  भावात मागील दोन आठवड्यांपासून चढ उतार दिसून येत आहेत. वाढलेल्या भावात कांद्याला उठाव कमी दिसत आहे. तर भाव कमी झाल्यानंतर कांद्याची बाजारातील आवक कमी होत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात चढ उतार दिसत आहेत. कालच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात काहिशी नरमाई आली होती. कांद्याचे भाव आज ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Market Update
Agriculture Commodity Market : सोयाबीन, कांदा, हरभरा, हळदीच्या किमतीत घट

टोमॅटोच्या दरात सुधारणा

टोमॅटोची बाजारातील आवक घटली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने टोमॅटो पिकाला मोठा फटका दिला. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली. मात्र दुसरीकडे टोमॅटोला उठाव कायम आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा दिसून आली. आजही राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव दिसून आला. बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी दिला. 

डाळिंबाचा भाव टिकून

राज्यातील बाजारात डाळिंबाला चांगला उठाव आहे. मात्र दुसरीकडे बाजारातील डाळिंबाची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे डाळिंबाचा बाजार टिकून आहे. त्यातही गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा तुटवडा जाणवत आहे. गुणवत्तापूर्ण डाळिंबाला बाजारात सध्या चांगला भाव मिळत आहे. राज्यातील बाजारांमध्ये डाळिंबाला सध्या सरासरी ६ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गुणवत्तापूर्ण मालाचा भाव १० हजारांपेक्षाही जास्त असल्याचे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. डाळिंबाचा बाजार टिकून राहू शकतो, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com