Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : मुगाचे बाजारभाव दबावातच; कापूस, सोयाबीन, लसूण तसेच काय आहेत गवार दर?

Daily Commodity Rates : आज आपण सोयाबीन, कापूस, लसूण, गवार आणि मूग पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात पुन्हा सुधारणा झाली होती. शुक्रावरी सोयाबीनचे वायदे १०.४४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंड ३०५ डाॅलर प्रतिटनांवर बंद झाले होते. देशातील बाजारात मात्र चढ उतार सुरुच आहेत. आज प्रक्रिया प्लांट्सनी खेरदीचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. बाजार समित्यांमधील दरपातळी मात्र ३ हजार ९०० ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार येऊ शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

लसूण तेजीतच

देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरु झाली. मात्र नव्या लसणाची आवक खूपच कमी आहे. दुसरीकडे लसणाला उठाव चांगला आहे. बाजारातील मर्यादीत आवक आणि चांगला उठाव यामुळे लसणाच्या भावातील तेजी कायम आहे. आजही देशातील बाजारात लसणाला सरासरी २५ हजार ते २८ हजार रुपयांचा भाव मिळाला. गुणवत्तापूर्ण लसणाचा भाव २८ हजारांच्या पुढे दिसत आहे. बाजारातील आवक वाढेपर्यंत लसणाचे भाव टिकून राहतील, असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गवारचे भाव टिकून

गवारच्या भावात काहीसे चढ उतार पाहायला मिळाले असले तरी सरासरी दरपातळी कायम दिसत आहे. बाजारातील गवारची आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. त्यामुळे गवारला मागील काही महिन्यांपासून तेजीतच दिसत आहेत. बाजारातील आवक आवक आजही कमीच होती. त्यामुळे बाजारात गवारला ५ हजार ते ६ हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला. तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच काहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज आहे.

मुगाचा बाजार दबावात

देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढली आहे. त्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. मुगाला उठाव असला तरी भावपातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसत आहे. देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कारल्याला चांगला उठाव

राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळत आहे. बाजारातील कारल्याची आवक कमी आहे. बाजारातील इतर भाजीपाल्याच्या दराचाही आधार कारल्याला मिळत आहे. कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे कारल्याला भावही चांगला आहे. सध्या बाजारात कारली प्रतिक्विंटल ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले. कारल्याची आवक यापुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कापूस दबावातच

कापूस भावावरील दबाव आजही कायम होता. कापसाच्या भावात मोठे चढ उतारही होताना दिसत नाहीत. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर एका मर्यादेत स्थिर दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी ६७.६० सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर बाजारातील आवक दीड लाख गाठींच्या दरम्यान आवक झाली होती. त्यामुळे देशातील बाजारात सध्या कापसाचा सरासरी भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील बाजारावर सध्या आवकेचा आणि कमी उठाव, या घटाकांचा दबाव आहे. आणखी दोन ते तीन आठवडे देशातील बाजारात कापसाची आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरपातळीही स्थिर राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT