Kabuli Chana Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : मेक्सिकोमुळे काबुली हरभरा वधारणार

Kabuli Chana Market : आंतरराष्ट्रीय बाजारात काबुली हरभऱ्याचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. जगातील महत्वाचा काबुली हरभरा उत्पादक आणि निर्यातदार देश म्हणून मेक्सिको ओळखला जातो.

Team Agrowon

१) कापूस दर निचांकी पातळीवर (Cotton Rate)

देशातील बाजारात कापूस दरावरील दबाव कायम आहे. पहिल्यांदा ऑफ सिझनमध्ये कापसाची आवक विक्रमी पातळीवर गेली आहे. त्यामुळे कापसाचे भाव हंगामातील निचांकी पातळीवर उतरले आहेत. देशात सध्या ९० हजार ते एक लाख गाठींच्या दरम्यान कापूस आवक होत आहे.

एरवी या काळात सरासरी २० हजार गाठी आवक असते. खरिपाच्या तोंडावर आवक प्रचंड वाढल्यामुळे दर पडलेत. कापसाचे भाव आता सरासरी ७ हजार ते ७ हजार ७०० रुपये क्विंटल आहेत. आणखी काही दिवस कापसाची आवक आणि दरावरील दबाव कायम राहील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

२) सोयाबीनच्या दरात नरमाई (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सायापेंडच्या दरातील चढ-उतार सुरुच आहेत. सोयाबीनचे वायदे सध्या दबावात असून १३.२६ डाॅलरवर आहेत. देशातही सोयाबीनचे भाव काहीसे नरमले आहेत. बाजारातील सोयाबीन आवक काहीशी वाढली आहे.

सध्या देशातील बाजारात एक लाख क्विंटलच्या दरम्यान आवक होत आहे. तर दरपातळी प्रति क्विंटल ४ हजार ८०० ते५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. सोयाबीनची ही दरपातळी आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) उन्हामुळे काकडीला उठाव (Cucumber rate)

वाढत्या उन्हामुळे देशातील बाजारात काकडीला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे काकडीला चांगला भाव मिळत आहे. बाजारातील काकडीची आवक मर्यादीत आहे. मोठ्या बाजार समित्या वगळता इतर ठिकाणची आवक सरासरीपेक्षा खूपच कमी दिसते.

त्यामुळे काकडीला सध्या १ हजार ५०० ते २ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. काकडीला पुढील काही दिवस उठाव कायम राहून दरपातळीत काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

४) गवारचे दर तेजीत (Gawar rate)

गवारची आवक घटल्यामुळे सध्या दर चांगला मिळतोय. राज्यात पुणे, मुंबई, नागपूर,नाशिक आणि कोल्हापूर बाजारसमित्यांमध्ये गवारची आवक जास्त दिसतेय. पण आवक सरासरीपेक्षा खूपच कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

त्यामुळे गवारला सध्या प्रति क्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. गवारचे दर पुढील काळातही तेजीत राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) काबुली हरभऱ्याचे भाव काय राहतील? (Kabuli Chana)

आंतरराष्ट्रीय बाजारात काबुली हरभऱ्याचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. जगातील महत्वाचा काबुली हरभरा उत्पादक आणि निर्यातदार देश म्हणून मेक्सिको ओळखला जातो. तिथे सध्या वाढत्या तापमानाचा काबुली हरभऱ्याला फटका बसतोय. मेक्सिकोत तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याचे उत्पादन यंदा घटणार आहे.

मेक्सिकोतील व्यापारी आणि विश्लेषक संस्थांच्या मते यंदा उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे निर्यातही घटण्याची चिन्हे आहेत. निर्यात ७० हजार टनांवरच स्थिरावण्याचा अंदाज आहे.

मेक्सिकोतून निर्यात कमी झाल्यास भारतीय हरभऱ्याला मागणी वाढेल. त्यामुळे निर्यातीसाठी चांगले दिवस येतील. पण भारतात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन वाढले नाही. देशात ४ लाख ५० हजार टन उत्पादनाचा अंदाज असताना प्रत्यक्षात ४ लाख टनांवर उत्पादन स्थिरावलंय.

काबुली हरभरा उत्पादनात भारत आणि मेक्सिको हे देश आघाडीवर आहेत. या दोन्ही देशांमध्ये उत्पादन घटण्याचे चित्र असल्यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या काबुली हरभऱ्याला गुणवत्तेनुसार प्रति क्विंटल ९ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.

पुढील काळात काबुली हरभऱ्याच्या दरात आणखी सुधारणा होईल, असा अंदाज व्यापारी आणि विश्लेषक व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT