
Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत राज्य सहकारी पणन महासंघ (मार्क.फेड.) अंतर्गत १७ खरेदी केंद्रावर हमीभावाने हरभरा विक्री केलेल्यांपैकी शुक्रवार (ता. १९) अखेर ९ हजार ४६६ शेतकऱ्यांना १ लाख ६४ हजार १५२ क्विंटल हरभऱ्याचे ८७ कोटी ५७ लाख ५३ हजार ५८७ रुपये एवढ्या रकमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.
यंदाच्या (२०२२-२३) हंगामात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) वतीने हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटिंग फेडरेशन) अंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील १७ केंद्रांवर शुक्रवार (ता. १९) अखेर १५ हजार ४९९ शेतकऱ्यांकडून २ लाख ४० हजार ९६२ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आला आहे.
या हरभऱ्याची एकूण किंमत १२८ कोटी ५५ लाख ३३ हजार १२३ रुपये होते. त्यात परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ८ केंद्रांवर शुक्रवार (ता. १९) अखेर नोंदणीकृत १८ हजार ६९५ पैकी ८ हजार ४१८ शेतकऱ्यांचा १ लाख ३१ हजार ४९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यत आला. त्याची किंमत ७० कोटी १५ लाख १३ हजार ८२१ रुपये आहे.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव कनेरगाव, साखरा, वारंगा, येळेगाव या ९ केंद्रांवर शुक्रवार (ता. १९) अखेर नोंदणीकृत ११ हजार ५४ पैकी ७ हजार ८१ शेतकऱ्यांचा १ लाख ९ हजार ४६९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. या हरभऱ्याची एकूण किंमत ५८ कोटी ४० लाख १९ हजार ३०२ रुपये होते.
हरभरा चुकारे अदायगी स्थिती (रक्कम कोटी रुपये)
परभणी ५१५ ४.२४
जिंतूर ४५७ ३.४२
बोरी ८१४ ९.०१
सेलू .७१० ७.७३
मानवत ७९८ ५.४९
पाथरी ७८४ ५.८१
सोनपेठ ५९८ ३.४५
पूर्णा ५०९ ४.५१
हिंगोली ९९७ ९.८७
कनेरगाव ५१८ ५.४५
कळमनुरी ८७९ ८.८५
वसमत २०९ २.१०
जवळा बाजार ७१४ ७.९८
सेनगाव ६०८ ५.८६
साखरा २०९ २.५६
येळेगाव .५६ ०.४६
वारंगा ९० ०.७१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.