Maize Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : मक्याच्या भावातील तेजी टिकून

Maize Rate : मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून तेजीत आहे. मक्याला देशात चांगला उठाव मिळतोय.

अनिल जाधव

Soybean Rate आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये कालच्या तुलनेत पुन्हा एकाद नरमाई आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १०.९० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३०८ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीनवरील दबाव कायम आहे. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ५०० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमधील भाव ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावातच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत कमी झाले होते. आज ७१.८३ सेंट प्रतिपाउंडच्या दरम्यान होते. तर देशातही वायदे दबावातच असून जुलैचा वायदा आज दुपारपर्यंत ५७ हजार १०० रुपयांपर्यंत खाली आला होता. बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ७ हजार १०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोच्या भावातील सुधारणा कायम आहे. टोमॅटोचा भाव मागील सतत वाढताना दिसत आहे. बाजारातील टोमॅटोची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. पण दुसरीकडे बाजारात टोमॅटोला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटोचा बाजार सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून तेजीत आहे. मक्याला देशात चांगला उठाव मिळतोय. पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योग आणि इथेनाॅल निर्मितीमध्येही मागणी चांगली आहे. यामुळे मका २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केद्रांवर मका २९९४ रुपयांनी विकला जात आहे. मक्याच्या भावात आणखी २०० ते ३०० रुपयांपर्यंतची सुधारणा पुढच्या काळात होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT