Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांद्याच्या भावात सुधारणा; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत कांद्याचे दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, डाळिंब आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरुच आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीन, सोयापेंडचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात नरमले होते. सोयाबीनचे वायदे आज तब्बल एक टक्क्याने कमी होऊन दुपारपर्यंत ११.९२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३६१ डाॅलर प्रतिटनांवर आले होते. देशातील बाजारातही काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत.

पण सरासरी दरपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांवर होती. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या वायद्यांमध्येही आज नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारी ७५.१४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर देशातील वायद्यांमध्येही नरमाई दिसून आली. देशातील बाजारात कापसाची आवक स्थिर आहे.

कापसाची आवक ३० ते ४० हजार गाठी प्रतिदिन आहे. त्यामुळे कापसाचे बाजार समित्यांमधील भावही टिकून आहेत. सध्या कापसाला सरासरी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

बाजारातील डाळींबाची आवक टिकून आहे. आवकेत जास्त प्रमाणात चढ उतार दिसत नाहीत. डाळींब पिकाला यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्याचा परिणाम बाजारातील आवकेवर होत आहे. त्यामुळे डाळिंबाची भावपातळीही कायम आहे.

उचांकी भाव काही ठिकाणी १५ हजार ते काही ठिकाणी २५ हजार रुपये दिसत आहे. पण डाळिंबाला सध्या सरासरी ८ हजार ते १० हजार रुपयांचा सरासरी भाव मिळत आहे. ही भावपातळी आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

तुरीच्या भावात काही बाजारात १०० ते २०० रुपयांपर्यंतचे चढ उतार दिसून येत आहेत. पण बाजारातील आवक मागणीपेक्षा कमी असल्याने तुरीचा सरासरी भाव मात्र कायम दिसतो. देशातील सर्वच बाजारांमधील आवक आता खूपच कमी झाली. पण सरकारच्या धोरणाचा तुरीच्या तेजीवर काही प्रमाणात का होईन दबाव दिसतो.

त्यामुळे तुरीचा बाजारात मागील काही महिन्यांपासून १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. तुरीचा हा भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

राज्यातील अनेक बाजारांमधील कांद्याची सरासरी आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. पण आजही अनेक बाजारात कांद्याचा किमान भाव ५०० रुपयांपेक्षाही कमी मिळत आहे.

तर चांगल्या कांद्याचा भाव २ हजार ५०० दरम्यान दिसतो. पण सरासरी दरपातळी की ज्या भावात जास्तीत जास्त कांदा विकला जातो तो भाव १७०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे, यापुढील काळातही बाजारातील कांदा आवक कमी होण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT