Agriculture Commodity Market : मूग, तुरीच्या दरात घसरण

Moong Market : मुगाची आवक सुरू झाली आहे. साधारणतः जून अखेर तिचे प्रमाण वाढते. सध्या गुजरातमध्ये आवक वाढती आहे; एकूण देशातील आवकेमध्ये तिचा ५० टक्के वाटा आहे.
Moong Tur
Moong TurAgrowon

फ्युचर्स किमतीः सप्ताह- २५ ते ३१ मे, २०२४

मुगाची आवक सुरू झाली आहे. साधारणतः जून अखेर तिचे प्रमाण वाढते. सध्या गुजरातमध्ये आवक वाढती आहे; एकूण देशातील आवकेमध्ये तिचा ५० टक्के वाटा आहे. वाढत्या आवकेमुळे मुगाच्या किमती एप्रिलपासून उतरत आहेत. आता त्या हमीभावापेक्षा कमी झाल्या आहेत. हा हमीभाव गेल्या वर्षाचा आहे. या वर्षीचा हमीभाव अजून जाहीर झाला नाही.

३ जूनपासून हळदीचे डिसेंबर डिलिवरी व्यवहार NCDEX मध्ये सुरू होतील. ३१ मे २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात मका, हळद व हरभरा वगळता इतर पिकांच्या किमतीत घट झाली. सर्वाधिक घट मुगाच्या किमतीत झाली. किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्यांनी वाढून रु. ५७,३२० वर आले होते. या सप्ताहात ते १.२ टक्क्यांनी घसरून रु. ५६,६६० वर आले आहेत. जुलै फ्युचर्स भाव १.२ टक्क्यांनी घसरून रु. ५७,६०० वर आले आहेत. सप्टेंबर फ्युचर्स भाव रु. ६०,५०० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ६.८ टक्क्यांनी अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात रु. १,४६३ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या सप्ताहात ०.९ टक्क्यांनी वाढून रु. २,२२० वर आल्या आहेत. फ्युचर्स (जून) किमती ०.७ टक्क्यांनी वाढून रु. २,२२९ वर आल्या आहेत. जुलै फ्युचर्स किमती रु. २,२४२ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १७,७८९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. १८,०३८ वर आल्या आहेत. जून फ्युचर्स किमती ११.८ टक्क्यांनी घसरून रु. १७,६०६ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १८,१९८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.९ टक्क्याने जास्त आहेत.

Moong Tur
Maize Export : मक्याच्या निर्यातीत ५८ टक्क्यां‍नी घट

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ६,६५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३.८ टक्क्यांनी वाढून रु. ६,९०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ३.३ टक्क्यांनी घसरून रु. ८,३१३ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता वाढू लागली आहे.

Moong Tur
Soybean Seed : सोयाबीन बियाण्याची महागाई, हमीचा अभाव

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ४,६५९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,९०० वर आली होती. या सप्ताहात ती १.८ टक्क्यांनी घसरून रु. १०,७०९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे; मागणीमुळे नोव्हेंबर पासून भाव वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,६७२ होती; या सप्ताहात ती रु. १,९८८ वर आली आहे. गेल्या सप्ताहात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,०४२ वर आली होती. या सप्ताहात रु. १,२०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com