Potato Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : बटाटा भावात किती नरमाई आली?

देशात यंदा बटाट्याचे उत्पादन वाढले. त्यामुळे दरात मोठी नरमाई दिसून आली. देशात बटाटा उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे.

Team Agrowon

१) सोयाबीन दरात नरमाई (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दारात आजही नरमाई पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे हंगामातील निचांकी पातळीवर पोचली. वायद्यांनी १४.१२ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला. तर सोयापेंडचे वायदे ४२६ डाॅलरवर पोचले.

देशातही सोयाबीनच्या दरात नरमाई दिसली. आज सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये होते. ब्राझीलच्या सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारावर दबाव आहे. त्यामुळं पुढील काही दिवस बाजारात ही स्थिती राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस बाजार काहीसा स्थिरावला (Cottom Rate)

देशातील कापूस बाजारात चढ उतार सुरु आहेत. अनेक बाजारांमध्ये कापसाच्या भावात क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली. आज कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार २०० रुपयांचा दर मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे वायदे ७८.४४ सेंट प्रतिपाऊंडवर होते. कापसाच्या दरावर सध्यातरी आवकेचा दबाव असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) उडदाचे भाव तेजीत (Urad Rate)

देशात सध्या उडदाचे भाव तेजीत आहेत. यंदा उडदाचे उत्पादन कमी झाले होते. ऐन उडीद काढणीच्या काळातच पावसाने देशातील बहुतांशी उत्पादक भागांमध्ये हजेरी लावली होती. परिणामी उत्पादनात यंदा मोठी घट झाली.

आयातही सरकारच्या अपेक्षेप्रमाणे होताना दिसत नाही. त्यामुळे उडदाचे दर तेजीत आहेत. सध्या उडदाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. उडदाच्या दरातील ही तेजी पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

४) उन्हामुळे काकडीला चांगला उठाव

उन्हाचा चटका वाढल्याने सध्या काकडीला चांगला उठाव आहे. पण बाजारातील आवक तशी मर्यादीत दिसते. सध्या काकडीची मोठ्या बाजार समित्या वगळता आवक कमी आहे. त्यामुळं काकडीला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार २०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.

तर पुढील काळात काकडीला मागणी वाढत जाईल. पण बाजारातील आवक मर्यादीत होईल. परिणामी काकडीच्या दरात तेजी येऊ शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) बटाटा उत्पादनाची स्थिती काय आहे? (Potato Market)

देशात यंदा बटाट्याचे उत्पादन वाढले. त्यामुळे दरात मोठी नरमाई दिसून आली. देशात बटाटा उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर. यंदा पश्चिम बंगालमधील बटाटा उत्पादन २९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज असून यंदा उत्पादन ११० ते १३० लाख टनांच्या दरम्यान राहील, असाही अंदाज व्यक्त केला जातोय.

तर उत्तर प्रदेशातील उत्पादन वाढून २४० लाख टनांवर पोचल्याचा अंदाज आहे. देशात यंदा उत्पादन वाढल्यानं दरावर दबाव वाढला. बटाट्याचे भाव ४ ते ५ रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झाले. सध्या चांगल्या बटाट्याचे भाव १४ ते १५ रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत.

गेल्या हंगामात याच काळातील भाव १९ ते २० रुपयांवर होते. बटाट्याचे भाव कमी झाल्यामुळे शेतकरी मात्र आर्थिक संकटात आले. सध्या बाजारभाव कमी असल्याने शीतगृहामध्ये बटाटा साठवला जातोय.

मात्र शीतगृहांना बटाटा विक्री करतानाही दर कमी मिळत आहे. बटाट्याचे भाव दबावात असल्याने पुढील हंगामात लागवडीवर परिणामही होऊ शकतो, असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT