soybean rate
soybean rate  agrowon
मार्केट बुलेटीन

Soybean Rate : सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजार कसा आहे?

टीम ॲग्रोवन

कापूस दर सुधारण्याची अपेक्षा

1. देशातील बहुतांशी भागात आता पाऊस थांबला. त्यामुळं कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी सुरु झाली. पुढील काही दिवसांमध्ये देशात कापूस पिकाला किती फटका बसला, याची माहिती मिळेल. शेतकऱ्यांनी कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचं सांगितलं. मात्र उद्योगांचा अंदाज जास्त उत्पादनाचा आहे. मागील आठवडाभरात कापसाला ७ हजार ते ९ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र कापसाला उद्योगांकडून मागणी वाढल्यानंतर शेतकऱ्यांना किमान सरासरी ९ हजार रुपये दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

हिरवी मिरची तेजीतच

2. राज्यातील बाजारात सध्या हिरव्या मिरचीची आवक कमी झाली. मात्र दिवाळीच्या सणामुळं मागणीत वाढ झाली आहे. सध्या पुणे, मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर बाजार समिती वगळता इतर बाजारांमधील आवक ही सरासरी १० क्विंटलपेक्षाही कमी होती. आवक कमी झाल्यानं मिरचीच्या दरातही सुधारणा झाली. सध्या बाजारात हिरव्या मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार रुपये दर मिळतोय. हिरव्या मिरिचीचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

मका दरावर दाबव

3. देशातील अनेक बाजारांमध्ये सध्या मका दर दबावात आले आहेत. सप्टेंबर महिन्यापर्यंत मका दरात तेजी होती. मात्र मक्याचे दर वाढल्याने पशुखाद्यात तांदूळ आणि बाजरीचा समावेश वाढला होता. त्यामुळं मक्याला उठाव कमी होऊन दर घटले. त्यातच पुढील महिन्यापासून नवा मका बाजारात येईल. त्याचाही दबाव दरावर आला. सध्या मक्याला सरासरी १ हजार ९०० ते २ हजार ३०० रुपये दर मिळतोय. यंदाच्या हंगामात मक्याचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.

भेंडीला उठाव कायम

4. बाजारातील आवक कमी असल्यानं भेंडीला सध्या चांगला दर मिळतोय. पुणे आणि मुंबई बाजार समितीत ३०० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली. मात्र इतर बाजार समित्यांमधील आवक ही सरासरी २० क्विंटलपेक्षाही कमी होती. दुसरीकडे भेंडीला उठाव कायम आहे. इतर भाजीपाला दरातील तेजीचा भेंडीलाही आधार मिळाला. सध्या बाजारात भेंडीला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये दर मिळतोय. पुढील काही दिवस भेंंडीचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी जाहीर केला.

सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजार कसा आहे?

5. राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. ऊनही पडल्यानं ओलं झालेलं सोयाबीन (Soybean) वाळत आहे. त्यामुळं मागील १५ ते २० दिवसांनंतर सोयाबीन काढणीसाठी (Soybean Harvesting) वातावरण चांगलं झालं. शेतात वाफसा आल्यानं दिवाळीच्या सणातही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामाला प्राधान्य दिल्याचं दिसतं. दिवाळी आणि रब्बीच्या पेरणीसाठी (Rabi Sowing) शेतकरी सोयाबीन विकताना (Soybean Sale) दिसत आहेत. मात्र आवक होणाऱ्या सोयाबीनमध्ये (Soybean Arrival) ओलावा अधिक आहे. परिणामी दर दबावात आहेत.

दिवाळीमुळं राज्यातील अनेक बाजार समित्या पुढील काही दिवस बंद असतील. पण सध्या बाजारात जास्त ओलावा असलेल्या सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर जूनं सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयानं विकलं जातयं. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन १३ ते १४ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान विकलं जातंय. शुक्रवारी सोयाबीननं १३.९७ डाॅलरचा टप्पा गाठला होता. मात्र आज दर पुन्हा १३.८० डाॅलरपर्यंत खाली आले होते. तिकडं जगातील सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीममध्ये ५ हजार ५७५ युआन प्रतिटनानं सोयाबीनचे व्यवहार झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलाचे दर वाढल्याचा आधार सोयाबीनला मिळतोय. तेलाचे दर आणखी वाढल्यास सोयाबीनचेही दर सुधारु शकतात. सध्याची बाजारातील स्थिती बघता सोयाबीनला किमान ५ हजार तर कमाल ५ हजार ७०० रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

Ethanol Production : केंद्राच्या निर्बंधांमुळे इथेनॉल निर्मितीत घट

Turmeric Seed : पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी थांबवली हळद बियाणे खरेदी

Agriculture Department : कृषी खात्याला गती देण्यासाठी ‘गेडाम पॅटर्न’

Mango Market : नागपूर-अमरावतीत स्थानिक आंबा वाणांचे दर दबावात

SCROLL FOR NEXT