Chana Market
Chana Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Chana Market: हरभरा लागवडीचा वेग मंदावला ?

Team Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत
1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील (Soybean Rate) तेजी कायम आहे. आज सोयाबीनचे दर जवळपास एक टक्क्याने वाढून प्रति बुशेल्स १५.३४ डाॅलरवर पोचले होते. खाद्यतेलाचे वाढते दर आणि सोयापेंडमध्ये आलेली तेजी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात (Internation Market Soybean Rate) सोयाबीनचे दर वाढलेत, असं जाणकारांनी सांगितलंय. असं असलं तरी देशांतर्गत बाजारपेठेत मात्र सोयाबीनचे दर आजही काहीसे स्थिर होते. देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये क्विंटल दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत असल्यानं देशातही सोयाबीनचे दर वाढतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

कापसाच्या दरात काहीशी सुधारणा

2. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ-उतार सुरु आहेत. चालू आठवड्यात वायदेबाजारात त्याचे पडसाद उमटले. आज कापसाचे वायदे दुपारपर्यंत ८३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. मात्र देशात कापसाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री एकदम कमी केली. त्याचा परिणाम दरावर झाला. आज काही बाजारांत कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. देशात आज कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार ९०० रुपये क्विंटल दर मिळाला. पुढील काही दिवसांमध्ये कापसाच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा कापूस बाजारातील अभ्यासकांचा अंदाज आहे.    

सिताफळाचे दर दबावात

3. राज्यातील काही बाजारांमध्ये आता सिताफळाची आवक वाढत आहे. मात्र सध्या बदलत्या वातावरणामुळे सिताफळाला अपेक्षेप्रमाणे उठाव मिळालेला नाही. त्यामुळे सिताफळाचे दर नरमले आहेत. सध्या बाजारात सिताफळाला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळतोय. सिताफळाला मागणी वाढल्यानंतर दरही वाढू शकतात, असा अंदाज व्यापारी सूत्रांनी व्यक्त केलाय. 

फ्लाॅवरचे दर पडले

4. राज्यातील बाजारात सध्या फ्लाॅवरचे दर पडले आहेत. बाजारातील आवक वाढल्याने दर कोसळल्याचं व्यापारी सांगत आहेत. बाजारात फ्लाॅवरला सध्या २०० रुपये क्विंटलपासून दर मिळत आहेत. तर शहरांतील बाजारात कमाल ८०० रुपयांनी फ्लॉवर विकला जातोय. सध्या फ्लॉवरला जो भाव मिळतोय, त्यातून वाहतूक खर्चही निघत नसल्यानं शतेकरी अडचणीत आले आहेत. बाजारातील आवक मर्यादीत होईपर्यंत फ्लाॅवरचे दर कमीच राहतील, असे भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितले.

देशात हरभरा लागवडीचे चित्र कसे राहिले?

5. सध्या कडधान्य बाजाराचे लक्ष देशातील हरभरा लागवडीकडे आहे. मागील वर्षभर हरभरा दर दबावात ठेवण्यात सरकारला यश आले. देशातील विक्रमी उत्पादन आणि नंतर नाफेडकडून होणारी विक्री यामुळे बाजारावर सतत दबाव राहिला. शेतकऱ्यांना बाजारात हमीभावापेक्षा ८०० रुपयांपर्यंत कमी दर मिळाला. बाजारात आवकेचा हंगाम नसतानाही सध्या हरभरा दर ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. यावरून हरभरा दरावरील दबाव लक्षात येतो. बाजाराची ही स्थिती पाहून शेतकरी यंदा हरभरा लागवड कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

मात्र सुरुवातीच्या टप्प्यात लागवडीचा वेग जास्त होता. त्यातच पेरणीला पोषक वातावरण होते. त्यामुळं क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा जास्त दिसत होतं. मात्र पेरणी पुढे गेली तशी स्थिती स्पष्ट होतेय. ३० डिसेंबरपर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील हरभरा लागवडीने गेल्या वर्षी याच काळात झालेल्या लागवडीशी बरोबरी साधली. हरभरा लागवड १०५ लाख हेक्टरवर पोहोचली. विशेष म्हणजे मागील काही आठवड्यांमध्ये हरभरा लागवडीचा वेग कमी होत गेला. हरभरा लागवड गेल्या वर्षीपेक्षा कमी राहिल्यास बाजारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खरेदीदार आणि प्रक्रियादार पेरणीचं चित्र स्पष्ट होण्याची वाट पाहत आहेत. तसंच सध्या देशात चांगल्या गुणवत्तेच्या हरभऱ्याचा पुरवठा कमी असल्याचं सांगतलं जातंय. त्यामुळे पुढील काळात या हरभऱ्याचे दर वाढू शकतात, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT