Dharashiv News: सोयाबीनला चांगला हमीभाव मिळावा, यासाठी आताचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावर असताना सोयाबीनच्या प्रश्नावर मोर्चा काढला होता. मात्र, मागील दहा वर्षांत सोयाबीनचे दर ‘जैसे थे’ आहेत. दरम्यान, २०१५ मध्ये ३११५ रुपये सोयाबीनला हमीभाव होता, तर आता ५३२८ रुपयांचा भाव आहे, परंतु खासगी व्यापारी हे तीन हजारांचाच भाव देत आहेत, ही वस्तुस्थिती..दिवसेंदिवस शेतीची अवस्था वाईट होत चालली आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. दरम्यान, अनेकदा शेतीत घाम गाळून चांगले उत्पादन मिळाले, तरी उत्पन्न चांगले होईलच याची शक्यता कमीच आहे. गेल्या दहा वर्षांचा आलेख पाहिला, तर शेतीत घातलेल्या बियाणांचा खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडायला तयार नाही..Soybean Price: हमीभावापेक्षा ११२८ ते १७२८ रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी.परिणामी, शेती सोडून मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही वर्षांत सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे. सोयाबीनकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते, कापसानंतर सोयाबीनला पसंती दिली जात आहे. वर्ष २०१४-१५ मध्ये सोयाबीनचे क्विंटलचे दर ३१०४ होते. आता अवघ्या ५३२८ रुपयांवर हमीभाव आहे; परंतु व्यापारी ३१०० रुपयांनीच खरेदी करत आहेत..मध्यल्या काळात सोयाबीन दहा हजारांवर पोचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा काहीसा फायदा झाला होता; मात्र त्यानंतर दर पडले. हे पडलेले दर अद्याप स्थिर आहेत. गतवर्षीपेक्षा दोन हजार रुपये क्विंटलने दर पडलेले आहेत. ही स्थिती अशीच राहिली तर शेतीवर मोठे संकट ओढावणार आहे. वर्ष २०१४ मध्ये खाद्यतेल ५० रुपये किलोप्रमाणे होते, आता दीडशे ते पावणेदोनशेवर जाऊन पोचले आहे..Soybean Price: सोयाबीन दर कमीच; तसेच काय आहेत ड्रॅगन, कापूस, कारली आणि झेंडूचे आजचे बाजारभाव .एकूणच शेतमालाचे भाव वाढत नसल्याने शेती संकटात सापडली आहे. राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तर राज्य सरकारने केंद्राकडे १० लाख टन सोयाबीन खरेदीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून, लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन हमीभावाने विक्री करावे, असे आवाहन सभापती विठ्ठल चव्हाण, उपसभापती संतोष तिडके व सचिव संजय माने यांनी केले आहे..जळकोट तालुक्यात सोयाबीन क्षेत्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यातही तालुक्यातील परिसरातील बहुतांश क्षेत्र सोयाबीन लागवडीखालील आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी सोयाबीनच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे..Soybean Price: सोयाबीन दबावात; तसेच काय आहेत आले, काकडी, गाजर आणि टोमॅटोचे आजचे बाजारभाव? .५३२८ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असतानाही सध्या सोयाबीन खासगी भाव ३१०० ते ४१०० दरम्यान आहे. दोन्हीत फरक जवळपास १४०० ते १५०० रुपयांचा दिसून येत आहे. दहा वर्षांत धान्याचे भाव वाढत नाहीत, दुसरीकडे मात्र तेलासह सोयाबीनपासून बनविलेल्या साहित्याचे दर वाढताना दिसतात..वर्षनिहाय हमीभाववर्ष २०१५-१६ ३७१३वर्ष २०१६-१७ ३७१३वर्ष २०१७-१८ २६४०-३०५०वर्ष २०१८-१९ ३१९२ वर्ष २०१९-२० ३६८५ .वर्ष २०२०-२१ ३८६९ वर्ष २०२१-२२ ६५५० वर्ष २०२२-२३ ४५३५ वर्ष २०२३-२४ ४५३५ वर्ष २०२४-२५ ५३२८ .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.