Video
Montha Cyclone: मोंथा चक्रीवादळ जमिनीवर आले; तीव्रता कमी झाली
Montha cyclone impact: मोंथा चक्रीवादळाने काल रात्री आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर त्याचे रुपांतर अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. ही प्रणाली सध्या आंध्र प्रदेशातून दक्षिण छत्तीसगडच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
