Pune News: रस्ता रोको करुनही सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नसेल, तर आज (ता.२९) दुपारी १२ वाजता रेल्वे बंद करून ‘भारत बंद’ करण्याचा निर्णय घेतला जाईल असा इशारा बच्चू कडूंनी दिला होता. त्यानंतरही सरकारकडून मागण्या मंजूर न झाल्याने काही आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रोकोचा मार्ग अवलंबला आहे. यावर, बच्चू कडू यांनी सांगितले की, रेल्वे रुळावर गेलेल्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवू नये. इथे आपली सरकार सोबत चर्चा सुरू आहे, तेव्हा रेल्वे अडवून आणखी प्रकरण चिघळू नका असे बच्चू कडूंनी आंदोलकांना सांगितले..नागपूरात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग, मच्छीमार आणि मेंढपाळ बांधवांच्या हक्कांसाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जमाव नागपुरात एकत्र आला आहे. गेल्या २ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबादसह इतर चार महामार्ग रोखून धरले आहे, परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे १५ तासांहून अधिक काळ अनेक वाहने महामार्गावर अडकून पडले आहे. .Bacchu Kadu: कर्जमाफी, नुकसान मदतीसाठी सरकार अपयशी; बच्चू कडू यांची सरकारवर टीका.शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेपर्यंत मोर्चा थांबणार नाहीपुढे ते म्हणाले की, वेळ पडली तर रक्त वाहण्याची गरज पडली तर आम्ही आमच्या छातीवर गोळ्या घ्यायला तयार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत असेही स्पष्ट केले. तसेच, आम्हाला मुंबईला बोलावून नागपुरातील आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी आम्हाला भीती आहे. आमच्या २२ मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्यात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागपुरात येऊन चर्चा करावी; आम्ही मुंबईला जाणार नाही. नागपुरातून आम्ही मुंबईकडे निघालो, तर या आंदोलनाचं काय होणार?” असाही प्रश्न कडूंनी उपस्थित केला आहे..Bacchu Kadu: कर्जमाफीच्या अध्यादेशाशिवाय माघार नाही; बच्चू कडू.रविकांत तुपकरांच वादग्रस्त वक्तव्यनेपाळमध्ये जसे काही मंत्री देश सोडून पळून गेले होते, तसेच इथेही परिस्थिती निर्माण करु , असे वक्तव्य करून रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी नागपूरनंतरचा पुढचा टप्पा मुंबईत ठेवावा करत, या हरामखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावं लागेल असा इशाराही रविकांत तुपकरांनी दिला. तुपकर पुढे म्हणाले की, आता शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या नाहीत. कितीही संकटं आली तरी मरायचं नाही. आमदारांना कापा, असं बच्चू कडू म्हणाले होते, पण मी सांगतो की दोन-चार मंत्र्यांना कापा. त्यांनी पुढे म्हटलं की, बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील, पण नागपुरात आमच्या छात्या कमी पडणार नाहीत. असंही ते म्हणाले. .काय आहेत मागण्या…१. शेतकऱ्यांचे सर्व कर्ज कोणत्याही अटीशिवाय तात्काळ माफ करावे.२. नियमित कर्जफेड करणाऱ्यांसह सर्वांचा सातबारा कोरा करावा.३. पिककर्ज, पॉलीहाऊस, शेडनेट, सिंचन, जमीन सुधारणा यासह सर्व कर्जे माफीत समाविष्ट करावीत.४. ऊसाला ९% रिकव्हरीसाठी ४३०० रुपये आणि प्रत्येक टक्क्यासाठी ४३० रुपये एफआरपी द्यावी.५. थकीत एफआरपी रक्कम तात्काळ वितरित करावी.६. कांद्यासाठी किमान ४० रुपये किलो भाव द्यावा व निर्यातबंदी कायमची रद्द करावी.७. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा; गायीच्या दुधाला ५० रुपये, म्हशीच्या दुधाला ६५ रुपये दर लागू करावा.८. दुध क्षेत्रासाठी एफआरपी आणि रेव्हन्यू शेअरिंग धोरण लागू करावे.९. दुधातील भेसळ रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.१०. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून कृषी मालाला हमीभावावर २०% अनुदान द्यावे..११. ग्रामीण घरकुलांसाठी ५ लाख रुपये अनुदान मिळावे.१२. पेरणीपासून कापणीपर्यंतचा खर्च मनरेगातून भागवावा.१३. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा.१४. दिव्यांग, निराधार, विधवा आणि अनाथांना दरमहा ६ हजार रुपये मानधन द्यावे.१५. मेंढपाळ आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण तयार करावे.१६. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा.१७. बेरोजगार युवांना नोकरीच्या संधी द्याव्यात.१८. विदर्भ व मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत.१९. शेतकऱ्यांना वीजबिल माफ करावे.२०. अपंग, वयोवृद्ध व विधवा महिलांसाठी नियमित अनुदान द्यावे.२१. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा कराव्यात.२२. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तात्कीळ मदत द्यावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.