Tur Market
Tur Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Tur Market : बाजारातील तूर आवक वाढली का?

Anil Jadhao 

देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये आता तुरीची आवक (Tur Arrival) हळूहळू वाढत आहे. आता मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही नवी तूर विक्रीला येत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर बाजारात सध्या तुरीची आवक जास्त आहे. तर अकोला, अमरावती, लातूर आणि अकोला या बाजारांमध्ये आवक हळूहळू वाढत आहे. पण सध्या तुरीला मिळणारा दर (Tur Rate) गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे की कमी आहे? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. कापसाचे दर नरमले

देशातील कापूस दर आज कमी झाले. वायदेही जवळपास १ हजार ५०० रुपयाने नरमले होते. मात्र ख्रिसमसच्या सुट्ट्या, नवीन वर्ष यामुळं खरेदीदार जास्त सक्रीय नाहीत. तसेच कोरोनाच्या बातम्यांचाही बाजारावर परिणाम होत असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं. आज बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ७ हजार ४०० ते ८ हजार ६०० रुपये दर मिळाला. ही स्थिती बाजारात जानेवारीच्या मध्यापर्यंत राहू शकते. त्यानंतर बाजारात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

2. सोयाबीन दर स्थिर

देशातील बाजारात सध्या आवक सरासरीपेक्षा कमी होत आहे. एरवी विक्रमी आवकेचा महिना असलेला डिसेंबर सध्या मर्यादीत आवकेमुळे चर्चेत आला. परिणामी सोयाबीनच्या दरात यंदा मोठी घट झाली नाही. सोयाबीनचे दर जवळपास एक महिन्यापासून टिकून आहेत. आजही सोयाबीनला ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. जानेवारीच्या मध्यानंतर सोयाबीनचे दर काहीसे वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

3. संत्रा दर दबावात

बाजारात आता संत्रा दाखल झालाय. मात्र सध्या संत्र्याची आवक कमी दिसतेय. पण उठाव जास्त नसल्याने संत्र्याला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळतोय, असं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं. सध्या बाजारात संंत्र्याला सरासरी ३ हजार ते ६ हजार रुपये दर मिळतोय. संत्र्याच्या मागणीवर थंडी आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. मात्र यंदा उत्पादन कमी असल्याने उन्हाचा चटका वाढल्यानंतर संत्रा भाव खाण्याची शक्यता आहे, असंही व्यापारी सूत्रांनी सांगितलं. 

4. वांग्याचे दर नरमले

राज्यातील बाजारात सध्या वांग्याचे दर कमी झाले आहेत. बाजारातील आवक काहीशी वाढली आहे, त्याचा परिणाम दरावर जाणवत असल्याचं भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून वांग्याचे दर नरमले आहेत. सध्या वांग्याला सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते ३ हजार रुपये दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 
 

5. देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये आता तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारात यापुर्वीच तुरीची आवक सुरु झाली. मात्र आता मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही नवी तूर येत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर बाजारात सध्या तुरीची आवक जास्त होतेय. तर अकोला, अमरावती, लातूर आणि अकोला या बाजारांमध्ये आवक हळूहळू वाढत आहे. मात्र सध्या बाजारात सध्याचे दर गेल्यावर्षी याच काळातली दरापेक्षा जवळपास १ हजार २०० ते १ हजार ४०० रपयांनी जास्त आहेत. सध्या तुरीला ६ हजार ८०० ते ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तर मागीलवर्षी याच काळात तुरीला सरासरी ५ हजार ६०० ते ६ हजार १०० रुपये दर मिळत होता. गेल्या हंगामात तुरीची लागवड चांगली होती. तसेच आयातीचा वगेही अधिक होता. पण यंदा तुरीची लागवड कमी झाली आणि त्यातच पिकाला पावसाचा फटकाही बसला. त्यामुळं यंदा तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. परिणामी सध्या तुरीचे दर जास्त आहेत. पुढील महिन्यापासून तुरीची बाजारातील आवक वाढेल. मात्र यंदा शेतकरी बाजारावर आवकेचा दबाव जास्त वाढू देणार नाही, असा अंदाज सध्या बाजारात बांधला जातोय. तसंच सध्याचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाजही कडधान्य बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT