Agriculture Market Products Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: हिरवी मिरची व शेवगा तेजीत, दोडका व चिंच दर घसरणीत; मक्यालाही बाजारात उठाव

Daily Commodity Rates: आज आपण मका, हिरवी मिरची, दोडका, शेवगा आणि चिंच बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

मक्याला उठाव

मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर आहे. बाजारातील मक्याची आवक सध्या कमी झाली. मात्र, यंदा मक्याचे उत्पादन वाढले आहे. तसेच वाढलेल्या दरात आयात वाढण्याचाही धोका आहे. मक्याचा स्टाॅकही आहे. त्यामुळे मक्याचे भाव स्थिर आहेत. सध्या देशात मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. चालू खरिपातही मक्याची लगावड वाढण्याचा अंदाज आहे. मात्र दुसरीकडे मक्याला इथेनाॅलसाठी चांगली मागणी आहे. यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात २०० ते ३०० रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

हिरवी मिरची तेजीतच

राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे मागणी आहे. त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत. सध्या लग्न सराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. त्यामुळे हिरवी मिरची ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयाने विकली जात आहे. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

दोडका आवक घटली

बाजारीत दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. तर दोडक्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे दोडक्याच्या भावातही सुधारणा दिसून आली. दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचला. दोडक्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

शेवगा दर तेजीतच

बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे. त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीतच आहेत. शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे शेवग्याची आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीत आहेत. शेवगा आजही ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला गेला. शेवग्याची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे. तर मागणीह टिकून राहील. त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

चिंचेला उठाव कमी

बाजारातील चिंचेची आवक मर्यादीत दिसत आहे. मात्र पावसामुळे मागणीवर काहीसा परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे चिंचेच्या दरात काहीसे चढ उतार सुरु झाल्याचे दिसत आहे. चिंचेचे दर अनेक बाजारात काहीसे कमी झाले आहेत. दुसरीकडे बाजारातील आकही कमी आहे. पण चिंचेला सध्या ७ हजार ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. चिंचेची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. तर पावसामुळे मागणीही स्थिर राहू शकते. परिणामी चिंचेच्या दरात चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Economic Survey: अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी ९ हजार कोटी मंजूर; आर्थिक पाहणी अहवालात सरकारची माहिती

Sugarcane Production : उन्हापासून उसाचे उत्पादन वाचवण्यासाठी सेंद्रिय उपाय

Khapli Wheat: खपली गहू पेरणीत खानदेशात घट

Onion export India : कांद्याचे १५०, द्राक्षाचे ३०० कंटेनर अडकले; इराण आणि इस्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे निर्यात ठप्प, शेतकरी व व्यापाऱ्यांना फटका

Gharkul Yojana: राज्यात एका वर्षात जवळपास ४ लाख घरकुले पूर्ण, हा आजपर्यंतचा विक्रम- जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT