Tur Rate
Tur Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीच्या दरावर सरकार लक्ष ठेऊन

Team Agrowon

१) सोयाबीन बाजार टिकून (Soybean Market)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ-उतार सुरुच आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.०५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांमध्ये काहीशी नरमाई येऊन ४५९ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारावर अर्जेंटीनाच्या सोयाडाॅलर धोरणाचा परिणाम होतोय. देशात सोयाबीनचा बाजार स्थिर दिसला. सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये दर मिळाला.

सोयाबीनच्या दरात काही दिवस क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांचे चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस दर कायम (Cotton Rate)

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ-उतार राहायला मिळत आहेत. देशात कापूस बाजारावर आवकेचा दबाव कायम दिसतो. सध्या बाजारात सरासरीपेक्षा जास्त आवक होतेय. त्यामुळं कापसाची दरपातळी प्रति क्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांनी आज दुपारपर्यंत ८३.४६ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. देशात पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील कापूस आवक कमी होणार आहे. या काळात कापूस दरात मोठी वाढ दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) हरभरा भाव दबावातच (Chana Rate)

तूर, उडिद आणि मुगाच्या दरात तेजी आहे. त्यामुळं सरकार कडधान्य दरावर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतंय. पण याचा फटका गेले वर्षभर दबावात असलेल्या हरभऱ्यालाही बसतोय. सध्या बाजारात हरभरा आवक वाढतेय.

नाफेडच्या खरेदीमुळं हरभरा बाजार टिकून आहे. सरकार बाजारावर लक्ष ठेऊन असल्याने स्टाॅकिस्ट सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळं हरभऱ्याला सध्या ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये क्विंटल भाव मिळतोय.

पुढील काळात सरकारचं धोरण आणि नाफेडची खरेदी यावरच बाजाराची चाल अवलंबून असेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

४) लाल मिरचीला दराचा तडका (Red Chilli Rate)

लाल मिरचीच्या दरातील तेजी अद्यापही टिकून आहे. यंदा लाल मिरचीचं उत्पादन घटलंय. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पिकाला मोठा फटका बसला होता. मागील हंगामातील शिल्लक साठाही खूपच कमी आहे. मागणी मात्र टिकून आहे.

त्यामुळं मिरचीला सध्या प्रति क्विंटल १६ हजार ते ३२ हजार रुपये सरासरी भाव मिळतोय. लाल मिरचीचे दर पुढील काळातही तेजीतच राहतील, असा अंदाज मिरची बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) तुरीला सध्या काय भाव मिळतोय? (Tur Market)

केंद्र सरकार तुरीच्या बाजारावर लक्ष ठेऊन आहे. सरकारने तुरीच्या स्टाॅकबाबत कठोर भुमिका घेतलीय. सरकार सतत व्यापारी, स्टाॅकिस्ट, मिलर्स आणि आयातदारांना आपल्याकडील स्टाॅकची माहिती देण्याच्या सूचना देत आहे. चुकीची माहिती दिल्यास कारवाई करण्याचाही इशारा सरकारनं दिलाय.

तसंच १० हजार टन आयात तूर खरेदीसाठी निविदा काढल्यात. पण सध्या खुल्या बाजारात तुरीला चांगला भाव मिळतोय. त्यामुळं सरकारला तूर खरेदी करणं सोपं राहणार नाही. पण सरकार सतत व्यापारी आणि स्टाॅकिस्ट यांच्यावरील दबाव वाढवतंय. त्यामुळे व्यापारी आणि स्टाॅकिस्ट पुढील काळात आपल्याकडील काही माल बाजारात आणू शकतात.

त्यामुळं बाजारावर किंचित दबाव येऊ शकतो. पण तुरीचे दर नरमलेल्या पातळीवर जास्त दिवस टिकणार नाहीत. दर पुन्हा उभारी घेतील. कारण देशात यंदा उत्पादन घटलंय, आयात मालही स्वस्त नाही, विदेशात तुरीची कमी उपलब्धता आहे आणि देशातील बाजारातील आवक कमी आहे.

त्यामुळे तुरीचे दर तेजीत राहतील, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ८ हजार ८०० रुपये क्विंटल भाव मिळतोय.

पुढील काळातही तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. खरिपात किती तूर लागवड होते आणि पाऊसमान कसे राहते, हे घटकही तूर बाजारावर परिणाम करतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT