डॉ.मनोज माळी, डॉ.सचिन महाजन, डॉ.हर्षवर्धन मरकडपाने गुंडाळणारी अळीप्रादुर्भावाची अवस्था ः अळीनुकसान प्रकार ःया किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊन नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिसून येतो.हळद पिकामध्ये या किडीच्या अंडी, अळी आणि कोष अवस्था या अनुक्रमे ४ ते ५, १३ ते २५ आणि ६ ते ७ दिवस असतात..किडीचा प्रौढ पतंग मध्यम आकाराचा असून पंख काळसर तपकिरी रंगाचे असतात. पंखावर पांढऱ्या रंगाचा मोठा ठिपका असतो.पूर्ण वाढलेली अळी २.५ ते ३.७ सें.मी. लांब व हिरव्या रंगाची असते. कोष फिक्कट हिरव्या रंगाचा असतो.किडीची अळी पाने गुंडाळून त्यात लपून राहून पाने खातात.पूर्ण वाढ झालेली अळी पानाच्या गुंडाळीतच कोषावस्थेत जाते..Turmeric Farming : शेतकऱ्यांनी हळदीचे रेसिड्यू फ्री उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घ्या.नियंत्रण ःकिडीच्या पानांवरील अळ्या व कोष अवस्था वेचून नष्ट कराव्यात.अळीने गुंडाळलेली पाने खोडून गोळा करून अळीसह नष्ट करावीत.रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि (ॲग्रेस्को शिफारस).सूत्रकृमी ःही कीड अतिशय सूक्ष्म असून, डोळ्यांना दिसत नाही. सूत्रकृमी हळदीच्या मुळांवर गाठी तयार करतात. जमिनीत पिकांच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषून घेते. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. फुटव्यांचे प्रमाण कमी होते. प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथम पिकाचा शेंडा मलूल होऊन पीक पिवळे पडून झाड मरते. कालांतराने ही कीड हळदीच्या कंदामध्ये प्रवेश करून कंद सडविण्याचे काम करते. सडलेले कंद तपकिरी रंगाचे दिसतात.सूत्रकृमीमुळे झालेल्या कंदावरील जखमांतून रोगकारक बुरशी कंदात प्रवेश करता. त्यामुळे हळद पीक कंदकूज रोगाला बळी पडते..Turmeric Farming : हळद पिकातील प्रमुख किडींचे नियंत्रण .नियंत्रण ःसूत्रकृमीच्या व्यवस्थापनाकरिता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस पावडर २ किलो प्रति एकरी २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापर करावा.भरणी करताना निंबोळी पेंड ८ क्विंटल प्रति एकर या प्रमाणात वापर करावा.हळद पिकात सापळा पीक म्हणून झेंडूचा वापर करावा. सूत्रकृमीच्या व्यवस्थापनाकरिता हळद पिकात झेंडू महत्त्वाची भूमिका बजावतो. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव व प्रसार कमी होण्यास मदत होते..खोडकिडा ः- प्रादुर्भावाची अवस्था ः अळीओळख ः- या किडीचा पतंग आकाराने लहान व नारंगी रंगाचा असतो. दोन्ही पंखावर काळ्या रंगांचे ठिपके असतात.- खोडकिडीचा प्रौढ, मादी व पतंग हळदीच्या कोवळ्या पानांवर अंडी घालतात.- अळी लालसर रंगाची असून पूर्ण शरीरावर काळे ठिपके असतात.- प्रौढ पतंग मध्यम आकाराचे असून पंखावर लहान काळे ठिपके आढळतात. हळद पिकाच्या सुयोग्य वाढीच्या काळात या किडीचा उपद्रव दिसून येतो..Organic Turmeric Farming : हळद पिकात सेंद्रिय शेतीचे महत्त्व .नुकसान प्रकार ः- अंड्यातून बाहेर आलेली अळी प्रथमत: पानांच्या कडेचे हरीतद्रव्य फस्त करते.- अळी खोड व हळदीचे कंद पोखरते. खोडाला छिद्र करून आत शिरते व आतील भाग खाते.- पिकाच्या खोडावर पडलेले छिद्र हे खोडामध्ये अळी जिवंत असल्याचे लक्षण आहे.- खोडकिडाग्रस्त हळद पिकाचे मध्यभागातील पान पिवळे पडलेले दिसते. कालांतराने खोड वाळायला सुरुवात होते..नियंत्रण ः- प्रादुर्भावीत झाडे उपटून, गोळा करून तत्काळ नष्ट करावीत.- निंबोळी तेल ५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार १५ दिवसांनी दुसरी फवारणी घ्यावी.- हळद लागवडीमध्ये एकरी १ या प्रमाणे प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. प्रकाश सापळा रात्री ७ ते १० या वेळेत चालू ठेवावा. यामध्ये किडीचे प्रौढ आकर्षित होतात. त्यांना नष्ट करावे.- हळद पिकात लागवडीनंतर ४० आणि ९० दिवसांच्या अंतराने महानीम (मेलीया डुबीया) किंवा घाणेरी (लॅटेना कॅमेरा) या वनस्पतीच्या पानांचे २ टन प्रति एकर प्रमाणे आच्छादन केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते..Turmeric Farming: हळदीमध्ये फेरपालटीसह आंतरपीक पद्धतीवर भर .- किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास,क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)- निसर्गत: आढळणाऱ्या अनेक मित्र किडींद्वारे खोडकिडीच्या अळीचे नियंत्रण होत असते. अशावेळी मित्रकिडींचे निरीक्षण करूनच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी..हुमणी ःप्रादुर्भावाची अवस्था ः अळीनुकसान प्रकार ः- किडीच्या अळीचा मुळांवर आणि नवीन वाढ होत असलेल्या कंदावर प्रादुर्भाव दिसून येतो.- मादी भुंगेरे रोज एक याप्रमाणे अंडी घालतात व त्यातून १५ ते २० दिवसांत अळी बाहेर पडते. अळी पांढऱ्या रंगाची असून त्यांचा आकार इंग्रजी ‘C’ अक्षरासारखा असतो..Turmeric Farming: हळदीची पाने पिवळी पडण्यामागील कारणे, उपाय.- अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीला काही दिवस सेंद्रिय पदार्थावर (शेणखतावर) उपजीविका करतात. सेंद्रिय पदार्थांचा अंश संपल्यानंतर अळ्या हळद पिकाची मुळे कुरतडतात. जास्त प्रादुर्भाव झालेल्या भागात कंदही कुरतडतात. मुळे कुरतडल्यामुळे हळदीचे पीक पिवळे पडते, रोप वाळण्यास सुरुवात होते.- हुमणी किडीची तीव्रता जास्त असलेल्या ठिकाणी हळद पिकाचे खोड उपटून पाहिल्यास ते सहज उपटून येतात. हळद पिकाचे पूर्णतः नुकसान होते..नियंत्रण ःहुमणी किडीच्या नियंत्रणासाठी सामूहिकपणे मोहीम राबवून एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास नियंत्रण सुलभ होते.- संध्याकाळच्या वेळेला या किडीचे भुंगेरे बाहेर पडतात. ते गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत..- पूर्ण चांगले कुजलेले शेणखत वापरावे. अर्धवट कुजलेले शेणखत वापरू नये.- जैविक नियंत्रणासाठी मेटॅरायझिम ॲनिसोपली ही परोपजीवी बुरशी हेक्टरी ५ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी.- हळद लागवडीनंतर प्रादूर्भाव आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस ४ मिलि प्रति लिटर पाण्यात घेऊन आळवणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.