Sustainable Farming : मातीशी नाळ जपत आणि निसर्गाची साद ओळखून शेती केली तर ती आनंदाचे निधान ठरते. आयुष्याचा नवा अर्थ गवसतो. मग जगणं आणि शेती एकमेकांपासून वेगळं काढता येत नाही. .अशा शेतीत चित्ताची एकाग्रता, शारीरिक व मानसिक व्यायाम आणि मन आतून शांत होण्याचा परिणाम आपोआप साधला जातो. ही केवळ हौसेखातर करायची शेती नाही. तर ती सर्वार्थाने भरपूर फायद्याची आहे. हे जगणं कितीही पैसे मोजले तरी अन्यत्र लाभणं शक्य नाही. कमीत कमी जोखीम, कमीत कमी नुकसान, कमीत कमी मनस्ताप आणि निसर्गासोबत आनंददायी जगणं ही या शाश्वत शेतीची चतुःसुत्री आहे..कष्ट, नियोजनातूनच मिळविली आर्थिक ताकदनिळवंडी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील सोमनाथ वामन पाटील आणि धाकटे बंधू रामदास यांनी २७ वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष शेतीची सुरुवात केली. अत्यंत कष्टपूर्वक त्यांनी शेतीत प्रगतीचे रंग भरले आहेत.शेती, माती, नाती जपणारा कोकणी शेतकरी‘त्याच्या जिवाक थारो खया, सारखो काम करीत आसता, त्यात आम्ही ही तीन म्हतारी माणसां त्याच्या पदरात, आमचा सगळा त्येकाच बघुचा लागता.’ शेती, नाती आणि मातीशी एकरूप होऊन सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेल्या सुनील नाईक यांच्याबद्दल त्यांचे ७९ वर्षीय काका राजाराम नाईक हे भरभरून बोलत होते..Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती.एकोप्याला शिस्तीची, आनंदाला समृद्धीची जोडउद्योग-व्यापारात लोक अहोरात्र ध्यास घेऊन काम करतात. इतकेच काय पण नोकरीतही पूर्ण आठ-दहा तास वेळ देतात. मग शेतीत असं का नाही करता येणार? हीच कामाची शिस्त आणि २५ जणांच्या एकत्रित कुटुंबाची ताकद या जोरावर गोविंदराव व सुभाषराव मुळे हे बंधू काटेकोर शेती करत आहेत.शेतीनं तारलंच नव्हे, तर उभं केलं...उत्तम शेती, मध्यम व्यापार अन् कनिष्ठ चाकरी असं मानणारी माणसं आजही आहेत. हेच सूत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नालेगाव (ता. वैजापूर) येथील बाबासाहेब गायकवाड यांच्या कुटुंबाला तंतोतंत लागू पडते..Agriculture Success Story: जिद्द सुनेला ‘सीए’ करण्याची.....शेती हीच एक प्रयोगशाळा...अमेरिकेतील काही वर्षांच्या वास्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे परतलेल्या मुक्तक जोशी यांनी गिरनेरा तांडा परिसरात शेत जमीन खरेदी केली. मिश्र पीक पद्धती, शून्य मशागत तंत्र, मजल्याची शेती तसेच दक्षिण कोरियात विकसित झालेले जदाम मॉडेल पद्धतीचे प्रयोग केले.माचीवरला शंकर...सह्याद्रीतील माची, गाव आणि शेती हेच शंकर ढवळे यांचं खरं विश्व. मुलांना प्रगतीच्या महामार्गावर आणून शंकर पुन्हा सह्याद्रीच्या रांगांत परतला. जंगलातील डोंगरवाटेने हिरव्या शेतीकडे जात काळ्या मातीत कष्टाचे हात भरवून घेतले..मी ‘सत्यग्राही’ शेती का करते?नांद्रे (ता.जि. धुळे) येथील कृषी पदवीधर शेतकरी प्रांजली किशोर बोरसे हिचे स्वत:च्या दोन एकर क्षेत्रातील सत्यग्राही शेतीचे अनुभव वेगळा विचार करायला लावणारे आहेत.सकारात्मकतेचा पेरा...साजणी (ता. हातकणंगले,जि. कोल्हापूर) येथील जंबूकुमार बापूसाहेब चौगुले यांनी गेल्या पंचेचाळीस वर्षांत ऊस उत्पादनात एकरी वीस टनांपासून ते एकशे वीस टनांपर्यंत आश्वासक झेप घेतली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.