Market Update  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, टोमॅटो तसेच काय आहेत आले दर?

Commodity Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, हरभरा आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन काहीसे सुधारले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आज दुपारपर्यंत काहीशी नरमाई आली होती. सोयाबीनचे वायदे १०.१२ डाॅलरवर पोचल्यानंतर भाव पुन्हा कमी झाले. आज दुपारपर्यंत १०.०५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१८ डाॅलर प्रतिटनांपर्यंत वाढले होते. देशात सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव आजही ४६०० ते ४७५० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसामध्ये चढ उतार

देशात आज कापसाच्या भावात काहीशी नरमाई होती. तर आंतराष्ट्रीय बाजारात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ६९.६४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५८ हजार ५०० रुपये प्रतिखंडी होते. बाजार समित्यांमध्ये मात्र भाव स्थिर आहेत. बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही ६ हजार ९०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोचा भाव स्थिरावला

टोमॅटोच्या भावात चढ उतार सुरु आहेत. टोमॅटोचा भाव मागील दोन दिवसांपासून पुन्हा काहीसा नरमला आहे. बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव दिसत आहे. वाढलेल्या पावसाचाही टोमॅटोच्या आवकेवर परिणाम दिसत आहे. आजही टोमॅटोचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये २ हजारांपेक्षा कमी दिसत आहे. तर जास्त आवक असलेल्या बाजारातील सरासरी भाव यापेक्षा कमी आहे. सध्या टोमॅटोला सरासरी १ हजार ३०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

आल्याचे भाव स्थिर

आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी भावापातळी सध्या ५ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

हरभऱ्यातील तेजी कायम

हरभऱ्याच्या भावातील तेजी मागील दोन दिवसांमध्ये पुन्हा वाढली. हरभऱ्याचा भाव दिल्ली आणि जयपूर सारख्या बाजारात ८ हजारांवर पोचला. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्टाॅकिस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयात मालही येत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT