Market Bulletin  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांची पुन्हा गोची

Market Bulletin : सध्या कांद्याचे भाव दबावात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंदची हाक दिली. त्यामुळे शेतकऱ्यांची आणखी गोची झाली.

अनिल जाधव

1. उत्तर भारतात सध्या नव्या कापसाची आवक सुरु झाली. पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांमधील बाजारात नवा कापूस दाखल होत आहे. सध्या नव्या कापसाला सरकारी प्रतिक्विंटल ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर वायद्यांमध्ये कापसाच्या दरात आज सुधारणा होऊन प्रतिखंडी ६१ हजार ३०० रुपयांवर पोचले. यंदा देशातील कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे भाव चांगले राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

2. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे कमी होऊन १३.१० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ३८८ डाॅलरचा टप्पा गाठला होता. मात्र देशातील भावपातळी आज ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होते. देशातील सोयाबीन पिकालाही कमी पावसाचा फटका बसत आहे. पण खाद्यतेल आयाचा दबाव सोयाबीन दरावर आहे. यामुळे सोयाबीनचे भाव आणखी काही दिवस दबावातच राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

3. गाजराचे भाव सध्या टिकून आहेत. बाजारातील गाजराची आवक गेल्या काही दिवसांपासून स्थिरावली आहे. तर मागणी मात्र कायम आहे. त्यामुळे गाजराचे भाव प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. गाजर पिकाला कमी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे बाजारातील आवक वाढण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

4. लसणाला बाजारात सध्या चांगला भाव मिळत आहे. बाजारातील लसणाची आवक सरासरीपेक्षा कमीच असून मागणी मात्र टिकून आहे. त्यामुळे लसणाचे भाव टिकून आहेत. सध्या राज्याच्या विविध बाजारात लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १० हजारांचा भाव मिळत आहे. लसणाचा हा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

5. सध्या कांद्याचे भाव दबावात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंदची हाक दिली. कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क काढावे, व्यापाऱ्यांना अडचणीत टाकणारे निर्णय घेऊ नये, नाफेड आणि एनसीसीएफने खेरदी केलेला कांदा पुन्हा बाजारात कमी भावात विकू नये, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. पण हा बंद किती दिवस असेल याबाबत माहिती देण्यात आली नाही. पण लिलाव बंद राहिल्यास याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसेल. आधीच कांद्यावर निर्यातशुल्क लावल्यानंतर बाजार काही दिवस बंद होता. त्यानंतर कांदा भावावर दबाव वाढून दर आणखी कमी झाले होते. आता व्यापाऱ्यांच्या बंदमुळे पुन्हा एकदा शेतकरी वेठीस धरले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असे शेतकऱ्यांना सांगितले.  कांद्याला सध्या बाजारात १ हजार ५०० ते २ हजार रुपायंच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील आवक मागील १५ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात घटली.आवक कमी असूनही केवळ सरकारच्या दबावामुळे बाजार स्थिर आहे. पण यापुढील काळात कांद्याची मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत राहण्याचा अंदाज आहे. चाळीतील कांद्याचे प्रमाण मोठ्या प्र्माणात घटले. खरिपातील लागवडी ३० ते ४० टक्क्यांनी कमी होऊन दुष्काळाचा फटका बसत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे जाणकारांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT