Market Bulletin
Market BulletinAgrowon

Agrowon Podcast : हळदीच्या भावात नरमाई ; १० हजार ते ११ हजारांचा दर

Market Bulletin : चालू हंगामात देशातील हळद लागवड घटली आहे. त्यातच दुष्काळी स्थितीचा पिकाला फटकाही बसत आहे. महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये पावसात मोठी तूट आहे. यामुळे हळद उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. यामुळे हळदीचे भाव तेजीत आले होते. पण मागील काही दिवसांपासून हळदीचे भाव स्थिरावले आहेत.
Published on



1. उत्तर भरतातील बाजारात नव्या कापसाची आवक सुरु झाली. सध्या आवकेचे प्रमाण कमी असले तरी दिवसागणिक वाढत आहे. तर देशाच्या इतर भागात मागील हंगामातील कापूस येत आहे. सध्या नव्या कापसाचे भाव ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. यंदा दुष्काळी स्थितीमुळे देशीतल कापूस आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. यामुळे कापसाचे भाव चांगले राहण्याचा अंदाज आहे. 

   
2. सोयाबीनचे सरासरी भाव मागील काही दिवसांपासून काहीसे वाढले आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ७०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे व्यवहार काहीसे मंदावले आहेत. तर सोयाबीन बाजारावर खाद्यतेल आयातीचा दबावही दिसत आहे. यामुळे आणखी काही दिवस सोयाबीनची भावपातळी कायम दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Market Bulletin
Agrowon Podcast : वाढलेले भाव पाहून नाफेडनेही काढला हरभरा विक्रीला

3. देशातील बाजारात मक्याची आवक मर्यादीत होत आहे. चालू खरिप हंगामात मक्याची लागवड तीन टक्क्याने अधिक झाली. पण दुष्काळी स्थितीचा फटका मका पिकालाही बसत आहे. त्यातच मक्याला मागणी वाढत आहे. त्यामुळे मक्याचे भाव २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पशुखाद्यासाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मक्याचे भाव टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Market Bulletin
Agrowon Podcast : टोमॅटोचे भाव अचानक कशामुळे पडले?

4. बाजारात सध्या भेंडीला चांगला भाव मिळत आहे. भंडीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. राज्याच्या अनेक भागात सध्या दुष्काळी स्थिती आहे. याचा भेंडी पिकाला फटका बसत आहे. तर भेंडीला मागणी टिकून आहे. त्यामुळे सध्या भेंडीला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काळातही भेंडीचे भाव टिकून राहून शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

5. चालू हंगामात देशातील हळद लागवड घटली आहे. त्यातच दुष्काळी स्थितीचा पिकाला फटकाही बसत आहे. महत्वाच्या हळद उत्पादक राज्यांमध्ये पावसात मोठी तूट आहे. यामुळे हळद उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यातच जागतिक पातळीवर हळदीला चांगली मागणी होती. त्यामुळे देशातून हळद निर्यातीत चांगली वाढ झाली. परिणामी देशातील हळद बाजाराला चांगलाच आधार मिळाला. तीन महिन्यांपुर्वी हळदीचे भाव ६ हजारांवर होते. पण त्यात आता दुपटीने वाढ झाली. तर वायदे ७ हजारांवरून १८ हजारांवर पोचले होते. पण वाढलेल्या भावात नफावसुलीही झाली. यामुळे हळदीच्या भावातील तेजी स्थिरावली आहे. तर भावातही काहीशी नरमाई देखील आली. सध्या बाजारात हळदीला १० हजार ते ११ हजारांचा भाव मिळत आहे. तर हळदीचे वायदे १५ हजारांवर आहेत. देशातील हळदीची भाव, मागणी आणि निर्यातीचे सौदे याची स्थिती पाहता हळदीचे बाजार आणखी काही दिवस या पातळीदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मात्र बाजारात एकदा मागणी आणि पुरवठ्यातील तफावत स्पष्ट झाल्यानंतर देशात तसेच निर्यातीसाठीही हळदीला मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर भावात आणखी सुधारणा होण्याचा अंदाज आहे. यंदा हळद भावाचा विक्रम करेल, असाही अंदाज काही जाणकार व्यक्त करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com