Agrowon Podcast
Agrowon Podcast Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीच्या दरातील तेजी मजबूत स्थितीत

Team Agrowon

१) सोयाबीन बाजार टिकून (Soybean Rate)

अमेरिकेत निर्माण झालेल्या बॅंकींगच्या तिढ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १४.७० डाॅलरवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४६५ डाॅलर प्रतिटनांवर होते.

देशातही याचा काहीसा परिणाम जाणवत आहे. पण दरपातळी काहीशी स्थिर आहे. सध्या देशात सोयाबीनला सरासरी ४ हजार ९०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळतोय. पण एप्रिलमध्ये परिस्थिती काहीशी सुधारु शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

२) कापसातील नरमाई कायम (Cotton Rate)

देशातील बाजारात सध्या कापसाची आवक दुप्पट होत आहे. त्यामुळे कापसाचे दरही दबावात आहेत. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये भाव मिळतोय. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या दरात नरमाई दिसून येत आहे.

भारतातील कापूस उत्पादनाचे अंदाज कमी होत आहेत. त्यामुळं कापसाची बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर एप्रिलच्या मध्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) हिरवी मिरची तेजीत (Green Chili Rate)

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक खूपच कमी होत आहे. राज्यातील पुणे, मुंबई, कोल्हापूर या बाजारांमध्ये आवक काहीशी अधिक दिसते. पण आवक सरासरीपेक्षा कमीच आहे.

त्यामुळे हिरव्या मिरचीला सध्या सरासरी ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. उन्हाचा चटका वाढल्यानंतर मिरचीची आवक आणखी घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

४) ज्वारीची आवक वाढतेय (Jowar Rate)

देशात सध्या रब्बीतील ज्वारी काढणी सुरु आहे. अनेक भागात ज्वारी काढणीने वेग घेतला. मात्र घटते उत्पादन आणि वाढलेल्या मागणीमुळे ज्वारीचे दर तेजीत आहेत.

सध्या ज्वारीला सरासरी ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर मिळतोय. आवकेक्या हंगामात दर या पातळीच्या दरम्यान राहू शकतात. तर आवक घटल्यानंतर दरात पुन्हा तेजी येऊ शकते, असा अंदाज ज्वारी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

५) सध्या तुरीची भावपातळी काय आहे? (Tur rate)

देशातील बाजारात तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. पण आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे तुरीच्या दरात तेजी आहे. मागील महिनाभरापासून आवक कमी असल्याने व्यापाऱ्यांना गरजेपुरती तूर मिळत नाही.

सध्या अनेक बाजारात तुरीचा सरासरी भाव ८ हजार ५०० रुपयांच्या पुढे गेला. त्यामुळं ८ हजार रुपयांपेक्षा कमी दरात खरेदी केलेली तूर काही व्यापारी बाजारात विकून नफावसुली करताना दिसत आहेत. मागील आठवडाभरात ग्राहक बाजारात तुरीची विक्री वाढलेली दिसली.

त्यामुळं तुरीच्या दरावर दारत क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची तेजी मंदी सुरु आहे. पण तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. एक-दोन बाजारांमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या तुरीला कमाल ९ हजारांचाही दर मिळाला. हिंगणघाट बाजारातील पावत्या सोशल माध्यमांमध्ये फिरत होत्या.

पण एक गोष्ट इथं लक्षात घ्यावी. हा भाव खूपच कमी मालाला मिळाला. सरासरी भाव ७ हजार ९०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे.

चालू हंगामात तुरीचे उत्पादन घटले. आयातीतूनही गरज पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT