Tur Rate  Agrowon
मार्केट बुलेटीन

Tur Rate : कमी आवकेमुळे तुरीच्या दरातील तेजी कायम

तुरीच्या दरात जास्त वाढ झाल्यास सरकार बाजारात हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाच्या सचिवांनी यासंबंधीचा इशारा नुकताच दिला.

Team Agrowon

कापूस दरात नरमाई (Cotton market)
1. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापूस दर नरमले होते. आज बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

तर दुपारपर्यंत कापूस वायदे १०० रुपयांनी कमी होऊन ६३ हजार २२० रुपयांवर होते. आयसीईवरील वायदेही ८१.५० सेंट प्रतिपाऊंडपर्यंत कमी झाले होते.

बाजारातील कापसाची आवक वाढल्यानं दर काहीसे दबावात आल्याचे व्यापारी सांगत आहेत. पण कापसाचे भाव जास्त कमी होणार नाहीत, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीन बाजर टिकून (Soybean Bhav)
2. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात आज सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे १५.२५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर  होते.

तर सोयापेंड ४९३ डाॅलरवर होती. तर देशात सोयाबीनचे दर स्थिर होते. आजही देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.

सोयाबीनचे सध्याचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हरभरा दर दबावात
3. हरभऱ्याचा बाजार सध्या दबावात आहे. हरभऱ्याला अनेक बाजारात ४ हजार ३०० रुपयांपासून दर मिळतोय. तर आज हरभऱ्याला सरासरी ४ हजार ६०० ते ४ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.

यंदा सरकारनं देशातील हरभरा उत्पादन चांगलं राहण्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र वाढत्या तापमानामुळं पिकाला फटका बसू शकतो, असं शेतकरी सांगत आहेत.

त्यामुळं नाफेडची खरेदी सुरु झाल्यास हरभरा बाजारालाही आधार मिळेल, असा अंदाज हरभरा बाजारतील अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

कांद्याचे भाव कमीच

4. राज्यातील बाजारात सध्या कांद्याची आवक जास्त आहे. त्यामुळं कांद्याचे दर दबावात आहेत. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार रुपये दर मिळतोय.

दुसरीकडे कांद्याची निर्यातही सुरु आहे. मात्र बाजारावर आवकेचा दबाव असल्यानं दरही दबावात असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

पुढील महिनाभरात बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे. पण पुढील काही दिवस कांद्याचे दर कायम राहतील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्याकांनी व्यक्त केला.  

तूर बाजार कसा राहू शकतो?

5. देशात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. अनेक भागांमधील तूर काढणी आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र बाजारातील तूर आवक वाढली नाही. उत्पादन घटल्यानं शेतकरी चांगल्या दराची वाट पाहत आहेत.

सध्या बाजारात तुरीला ७ हजार ते ८ हजार रपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळतोय. चांगल्या गुणवत्तेच्या तुरीला ८ हजार ४०० रुपयांपर्यंतही दर आहे. पण हा भाव कमी मालाला मिळतोय. तर दुसरीकडे तुरीला उठाव चांगला आहे. त्यामुळं तुरीचे दर टिकून आहेत.

यंदा देशात मागील हंगामातील शिल्लक साठा कमी आहे, देशातील उत्पादन घटले, शेतकरी तुरीची विक्री कमी करत आहेत तसेच म्यानमार आणि सुदानमधून आयात होणाऱ्या तुरीचे दरही जास्त आहेत. त्यामुळे देशात तुरीचे दर तेजीत आहेत.

तुरीच्या दरात जास्त वाढ झाल्यास सरकार बाजारात हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाच्या सचिवांनी यासंबंधीचा इशारा नुकताच दिला. सरकारने बाजारात हस्तक्षेप केल्यास तुरीच्या दरात काही काळ दबाव येऊ शकतो.

पण शेतकऱ्यांनी बाजारातील विक्री मर्यादीत ठेवल्यास हा दबाव जास्त काळ राहणार नाही, असं व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारातील आवक कमी असल्यानं तुरीचे सध्याचे भाव टिकून राहू शकतात.

तूर आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दर सध्याच्या दरपातळीवरून वाढूही शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT