Cotton Market
Cotton Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Cotton Market : कापूस उत्पादकच स्टाॅकीस्ट झाला का?

Anil Jadhao 

यंदा देशातील कापूस लागवड (Cotton Sowing) वाढली मात्र उत्पादकता कमी राहीली. कापसाचा हंगाम (Cotton Season) सुरु होऊन आता अडीच महिने झाले. मात्र यंदा बाजारातील आवक खूपच कमी आहे. मग कापसाचा साठा नेमका कुणाकडे आहे? कापूस विक्रीबाबत यंदा शेतकऱ्यांची भुमिका काय आहे? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. सोयाबीन दर कायम


आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ उतार सुरु आहेत. तसेच सोयातेलही मागील काही दिवसांपासून एका भावपातळीभोवती फिरत आहे. त्यामुळं देशातील सोयाबीन दरही स्थिरी आहेत. सोयाबीनच्या दरात वाढ नसल्यानं बाजारातील आवकही मर्यादीत होतेय. सोयाबीन दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवलं. सोयाबीन बाजारातील अभ्यासकांच्या मते खाद्यतेल बाजारात जानेवारीत सुधारणा होऊ शकते. त्याचा फायदा सोयाबीनला मिळेल. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळतोय. 
 

2. तुरीचा बाजार तेजीतच

शेतकऱ्यांची तूर आता बाजारात दाखल होतेय. मात्र दुसरीकडे आयातही जोमात सुरु आहे. सध्या म्यानमार आणि सुदान या देशांमधून आयात होणाऱ्या तुरीचे भाव ७ हजार २०० ते ७ हजार ३५० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर मालावी आणि मोझांबिकच्या तुरीला ५ हजार २०० ते ६ हजार ५० रुपये दर मिळतोय. मात्र हजर बाजारात यापेक्षा कमी दर मिळतोय. दुसरीकडं बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. यंदा तुरीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

3. कारल्याला चांगला उठाव

देशातील बाजारात कारल्याला सध्या चांगला दर मिळतोय. कारल्याला मागणी वाढल्याचं विक्रेते सांगत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत बाजारातील आवक काहीशी मर्यादीत असल्याचंही सांगितलं जातं. सध्या मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या बाजार समित्या वगळल्या तर सरासरी आवक ही १० ते २० क्विंटलच्या दरम्यान होते. त्यामुळं सध्या कारल्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. कारल्याचे दर टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

 4. पपईला सरासरी दर

राज्यात पपई लागवडीचं क्षेत्र जास्त आहे. उत्पादनही वाढतंय. मात्र प्रत्येक हंगामात पपईला दरासाठी झगडावं लागतं. सध्या पपईला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ते २ हजार रुपये दर मिळतोय. सध्या पपईला उठावही मर्यादीत राहतोय. परिमामी दर काहीसे दबावात आहेत. राज्यात उन्हाचा चटका वाढल्यानंतर पपईच्या दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
 

5. देशातील कापूस उत्पादन यंदा उद्योगाच्या अंदाजापेक्षा कमीच राहील, असं बाजारातील अभ्यासक सांगत आहेत. मागील हंगामात कापसाला चांगला दर मिळाला होता. त्यामुळं यंदा देशातील कापूस लागवड वाढली. मात्र पिकाला पावसाचा फटका बसला, कीड- रोगांचाही प्रादुर्भाव झाला. त्यामुळं उत्पादकता कमी राहीली. भारतासोबतच पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्येही कापूस पिकाला फटका बसला. त्यामुळं जागतिक कापूस वापर कमी राहण्याचा अंदाज असला तरी दर चांगलेच राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. चालू हंगामात १ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर या अडीच महिन्यांच्या काळात ५८ लाख गाठी कापसाची आवक झाल्याचं उद्योगांनी स्पष्ट केलं. मात्र गेल्यावर्षी याच काळात १०६ लाख गाठी कापसाची आवक झाली होती. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा ४५ टक्क्यांनी कापूस आवक कमी राहीली. मागील काही दिवसांपासून दर नरमल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली. यंदा देशातील कापूस उत्पादन कमी आहे, डिसेंबरनंतर कापसाचे दर सुधारू शकतात याचा अंदाज शेतकऱ्यांना आलाय. त्यामुळं शेतकरी सध्या गरजेपुरताच कापूस विकत आहेत. त्यामुळं सध्या तरी कापसाचा स्टाॅकीस्ट शेतकरीच असल्याचं जाणकार सांगतात. सध्या देशातील बाजारात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळतोय. जानेवारीत कापसाचे दर वाढू शकतात. शेतकऱ्यांना यंदा सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असा अंदाजही कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Export Ban : न्यायालयाने दिला तांदूळ निर्यातदारांच्या बाजूने निर्णय; केंद्र सरकारला सुनावले!

Mango Festival : कोल्हापूर, सांगलीत ‘आंबा महोत्सव’

Indian Spices Product Ban : आधी हाँगकाँग-सिंगापूर आणि आता शेजारच्या देशाने घातली भारतीय मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण

Panjab Stubble Burning : पंजाबमध्ये गव्हाचे अवशेष जाण्यावर भर; जम्मू-काश्मीरच्या राजौरीत जंगलास आग

SCROLL FOR NEXT