Cotton Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन आणि सोयातेलाच्या वायद्यांमध्ये सुधारणेसह बाजार बंद झाला होता. तर सोयापेंडच्या भावातील चढ उतार कायम होते. देशातील बाजारात सोयाबीनची भावपातळी स्थिर आहे.

प्रक्रिया प्लाट्सचे भाव आजही ४ हजार ५५० ते ४ हजार ६७५ रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये आजही सोयाबीनचे व्यवहार सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयाने पार पडले. सध्यातरी बाजारातील परिस्थिती दरात मोठ्या सुधारणेच्या बाजुने नाहीत, असे अभ्यासकांनी सांगितले. 

वायद्यांमध्ये कापसाच्या भावात मागील आठवडाभर चढ उतार राहीले. तर आठवड्याच्या शेवटी बाजार वाढीसह बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ९३.९३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातली वायदे ६३ हजार ६८० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते.

बाजार समित्यांमध्येही दरात आठवडाभर १०० रुपयांपर्यंत चढ उतार होते. पण सरासरी भावपातळी ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होती. कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार राहतील, असा अंदाज आहे.  


हरभऱ्याचे भाव सध्या टिकून आहेत. हरभरा उत्पादनात घटीचे अंदाज येत आहेत. त्यातच हरभऱ्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे हरभऱ्याला चांगला आधार मिळतोय. बाजारातील आवक हळूहळू वाढताना दिसतेय.

पण यंदा हरभऱ्याच्या आवकेचा दबाव कमीच राहू शकतो, असे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे सध्या हरभऱ्याला ५ हजार ४०० ते  ६ हजारांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. हा भाव आणखी काही काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ज्वारीची बाजारातील आवक वाढल्यानंतर बाजारभाव नरमले आहेत. रब्बी ज्वारीची काढणी झाल्यानंतर राज्यातील महत्वाच्या बाजारातील आवक वाढली. सोलापूर, नगर, जळगाव, लातूर या जिल्ह्यांमधील महत्वाच्या ज्वारी बाजारात माल जास्त येतोय.

त्यामुळे भावपातळी आता ज्वारीचे वाण आणि गुणवत्तेनुसार सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

कांद्याच्या बाजारातील चढ उतार आजही कायम होते. कांदा भावात १०० ते २०० रुपयांचे चढ उतार दिसत आहेत. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांदा भाव आज कालच्या तुलनेत काहीसे वाढले आहेत.

कांद्याचा आजचा सरासरी भाव १३०० ते १७०० रुपयांच्या दरम्यान होता. तर काल हाच भाव १२०० ते १५०० रुपये होता. निर्यातबंदी असेपर्यंत कांदा बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT