Cotton Market : परभणी बाजार समितीत कापसाला ७३०० ते ८००० रुपयांचा

Cotton Rate : नंबर एक प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७९०० ते कमाल ८००० रुपये तर सरासरी ७९४० रुपये दर मिळाले. फरदड कापसाला ७३०० ते ७८०० रुपये दर मिळाले.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मध्यम धाग्याच्या नंबर एक प्रतीच्या कापूसदरात पंधरवाड्यापासून सुधारणा सुरू आहे. एफएक्यू दर्जाच्या कापसला सरासरी ८००० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.

गुरुवारी (ता. १४) परभणी बाजार समितीत कापसाची सुमारे २५०० क्विंटल आवक होती. नंबर एक प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७९०० ते कमाल ८००० रुपये तर सरासरी ७९४० रुपये दर मिळाले. फरदड कापसाला ७३०० ते ७८०० रुपये दर मिळाले.

परभणी बाजार समितीत ७ ते १३ मार्च या कालावधीत कापसाची ६८२५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विटंल सरासरी ७९५० ते ८०४५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १३) कापसाची १८७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७९९५ ते कमाल ८३०० रुपये तर सरासरी ८०४५ रुपये दर मिळाले.

Cotton Market
Cotton Farming : ‘सघन’च्या व्याप्तीत उत्पादकांचे हित

मंगळवारी (ता. १२) १६०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७९५० ते कमाल ८३०० रुपये तर सरासरी ८०४० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ११) ६५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७९४५ ते कमाल ८०६५ तर सरासरी ८००५ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. ९) ११५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७९५० ते कमाल ८०८५ रुपये तर सरासरी ८००५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ७) १५५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८०२० रुपये दर मिळाले.

Cotton Market
Cotton Cultivation : सघन कापूस लागवड तंत्रात हुकूमत मिळवलेले ठाकरे

मानवत बाजार समितीत बुधवारी (ता. १३) कापसाची ५००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७७०० ते कमाल ८०८० रुपये तर सरासरी ८००० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. १२) ५३०० क्विंटल आवक होऊन किमान ७६०० ते कमाल ८१३० रुपये तर सरासरी ८०८० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ११) ३४५० क्विंटल आवक असताना किमान ७९७५ ते कमाल ८१२५रुपये तर सरासरी ८०५० रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता. ९) ४८०० क्विंटल आवक होऊन किमान ७७०० ते कमाल ८१२० रुपये तर सरासरी ८०७५ रुपये दर मिळाले. जिल्ह्यात यंदाचा कापूस खरेदी हंगाम सुरू झाल्यापासून फेब्रुवारी अखेरपर्यंत कापसाच्या दरात घट सुरू होती. दरात आणखी घट होऊन नुकसान होईल या भीतीने तसेच आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कापसाची विक्री केली.

मार्चमध्ये कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे. मध्यम धाग्याच्या नंबर एक प्रतीच्या कापसाला सरासरी आठ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आवकेत काहीशी वाढ झाली. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ३० ते ३५ टक्के शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असण्याचा अंदाज आहे.
- संजय तळणीकर, सचिव, बाजार समिती, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com