Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस काहिसा नरमला; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत कांदा दर?

Agriculture Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, मका, टोमॅटो आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन दबावातच

सोयाबीनची बाजारातील आवक वाढत असून दर दबावातच आहेत. हमीभावाने सोयाबीन खरेदीची गती खूपच धीमी आहे. त्यामुळे हमीभाव खरेदीचा आधार सोयाबीनच्या खुल्या बाजाराला होताना दिसत नाही.

सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीन सतत १० डाॅलरपेक्षा कमी भावात विकले जात आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस नरमला

मागील आठवड्यात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यानंतर बाजारात कापसाचे भाव स्थिरावले आहेत. बाजारातील कापसाची आवकही वाढली आहे. रोज जवळपास १ लाख ८० ते २ लाख गाठींच्या दरम्यान बाजारात आवक होत आहे.

मात्र बाजार टिकून आहे. देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव ६ हजार ९०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर वाद्यांमध्ये चढ उतार सुरु असून ५५ हजार ४०० रुपये प्रतिखंडीवर होते. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

उन्हाळ कांदा तेजीतच

बाजारात सध्या उन्हाळ कांद्याची आवक खपूच कमी झाली आहे. तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याचे भाव तेजीतच आहेत. उन्हाळ कांद्याला सध्या बाजारात सरासरी ५ हजार ते ६ हजारांचा भाव मिळत आहे.

तर खरिप लाल कांद्याचा भाव ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. खरिप कांद्याची बाजारातील आवकही सध्या कमीच आहे. त्यामुळे लाल कांद्यालाही चांगला भाव मिळत आहे. पुढील काळात कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.

मक्याच्या दरात काहिशी सुधारणा

बाजारातील मक्याची आवक स्थिरावली आहे. तर दुसरीकडे मक्यामधील ओलावा कमी झाला. त्यामुळे मक्याच्या भावात मागील ८ दिवसांच्या काहिशी सुधारणा दिसून येत आहे. मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या २ हजार १०० ते २ हजार २०० रुपये दिसून येत आहे. मात्र ओलावा अधिक असलेल्या मालाला आजही कमी भाव मिळत आहे.

त्यामुळे किमान भावपातळी आजही १८०० रुपये दिसत आहे. यापुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे मक्याचे बाजारभाव टिकून राहतील, असा अंदाज मका बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटो भाव टिकून

मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक काहिशी वाढलेली दिसते. याचा परिणाम टोमॅटोच्या भावावर दिसून आला. टोमॅटोचा बाजार राज्यात मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे २०० ते ५०० रुपयानी कमी झाला.

मात्र आज टोमॅटोचा बाजार स्थिर होता. टोमॅटोला सध्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी २ हजार २०० ते २ हजार ६०० रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी वाढेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT