Onion Price : इंदापुरात कांद्याला सहा हजार रुपयांचा दर

Indapur APMC Update : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला रविवारी (ता. १) प्रति क्विंटल सहा हजार रुपये असा दर मिळाला.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Indapur News : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला रविवारी (ता. १) प्रति क्विंटल सहा हजार रुपये असा दर मिळाला. मक्याची ३५ हजारांहून अधिक पिशव्यांची आवक होऊन ५ कोटी ५० लाखांची उलाढाल झाली. यामध्ये मक्याला २ हजार २५१ रुपये भाव मिळाला, अशी माहिती सभापती तुषार जाधव यांनी दिली.

Onion Market
Onion Export : श्रीलंकेनं कांद्यावरील आयात शुल्कात केली कपात; श्रीलंका सरकारचा निर्णय

श्री. जाधव म्हणाले की, मुख्य बाजार इंदापूर येथे चालू सप्ताहात डाळिंब किमान २० ते १५१, पेरू १० ते २५, सीताफळ १० ते ५० प्रतिकिलो दराने विक्री झालेली आहे. तर मासे (मासळी) मार्केट इंदापूर भिगवण येथे मार्केटमध्ये व मासे (मासळी) विक्री उच्चांकी दरात होत असून त्यास खरेदीसाठी आंध्र प्रदेश, कलकत्ता, कर्नाटक, तेलंगणा अशा राज्यांतून मागणी आहे.

Onion Market
Onion Market : चाळीस दिवसांत शेतकऱ्यांना मिळणार कांद्याचे पैसे

मार्केटमध्ये खरेदीदार खरेदी चांगल्या दरात करीत आहेत. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला दर मिळावा, या उद्देशाने मुख्य बाजार इंदापूर अकलूज रोडलगतच्या बाजार आवारात धान्य सफाई यंत्र सुविधा उभारली. प्रति तास पाच टन क्षमतेने धान्य सफाई केली जाते. तसेच इंदापूर बाजार समितीने शेतमाल तारण योजनाही बाजार समिती सुरू केलेली आहे.

याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. बाजार समितीने मुख्य बाजार इंदापूर मार्केट ६० टन, शिवलिलानगर-इंदापूर अकलूज रोडलगत ८० टन, उपबाजार भिगवण, निमगाव केतकी व वालचंदनगरचे ठिकाणी ६० टन व क्षमतेचे भुईकाटा (वे-ब्रिज) असून त्यांची २४ तास सेवा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या विविध योजना व उपक्रमाचा लाभ घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com