Chana Rate
Chana Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : वाढलेल्या उष्णतेमुळे हरभरा उत्पादकतेला फटका

Team Agrowon

१) सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन (Soybean Market) आणि सोयापेंडच्या (Soymeal Rate) दरात सुधारणा पाहायला मिळाली. दुपारी १ वाजेपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.१२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४७२ डाॅलरवर होते. देशातील सोयाबीन दरात आज क्विंटलमागं ५० रुपयांची सुधारणा दिसली.

आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव होता. सध्याच्या भावात आणखी सुधारणा होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

२) कापूस दरात चढ उतार (Cotton Rate)

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारपर्यंत ८४.१५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील बाजारात कापूस दरातील नरमाई कायम होती.

आजही कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपये भाव मिळाला. कापूस दरातील सध्याची नरमाई तात्पुरती असून दर पुन्हा सुधारतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) तुरीतील तेजी कायम

तुरीची काढणी सध्या वेगाने सुरु आहे. पण बाजारात आवक कमी होतेय. राज्यातील सोलापूर, लातूर, जालना आणि अकोला बाजारात तुरीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे.

परिणामी तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला प्रतिक्विंवटल सरासरी ७ हजार ३०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तुरीच्या दरातील तेजी यंदा टिकून राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

४) गाजराला चांगला उठाव

बाजारात सध्या गाजराला चांगाल भाव मिळतोय. बाजारातील गाजराची आवक मागील काही दिवसांपासून मर्यादीत होत आहे. पण गाजराला चांगाल उठाव आहे. त्यामुळं गाजर चांगलाच भाव खाताना दिसत आहे.

सध्या केवळ पुणे, मुंबई आणि नाशिक बाजारात गाजराची आवक काहीशी अधिक दिसते. मात्र इतर बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.

त्यामुळं गाजराला सध्या १ हजार ८०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. गाजराचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

५) हरभरा बाजार दबावातच राहणार का?

देशातील काही बाजारांमध्ये नवा हरभरा दाखल झाला. पण बहुतेक भागांमध्ये सध्या पीक शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळं मार्च महिन्याच्या मध्यानंतर काढणीला (Chana Harvesting) वेग येईल. तर बाजारातील हरभरा आवक (Chana Arrival) मार्च महिन्याच्या शेवटी दाटेल.

सध्या हरभरा दर हमीभावापेक्षा ५०० ते ७०० रुपयाने कमी आहेत. केंद्राने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ३३५ रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहिर केला. तर बाजारात सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.

केंद्राने यंदा देशात १३६ लाख टन हरभरा उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवले. तसेच नाफेडकडे अद्यापही १५ ते १६ लाख टन हरभरा स्टाॅक आहे. यामुळं हरभरा भाव सध्या दबावात आहेत. पण यंदा हरभरा पिकाची स्थिती ठिक नाही. अनेक भागात दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाली.

मार्च महिन्यातही तापमान जास्त राहण्याचा अंदाज आहे. तापमान वाढल्यानं हरभरा लवकर पक्व होतोय. त्यामुळं उतारा घटत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये फेब्रुवारीतच हरभरा पिकाला फटका बसल्याचे वृत्त आहे.

त्यामुळं उत्पादनात १० ते १५ टक्के घट येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मार्च महिन्यात उष्णता वाढल्यास त्याचा हरभरा पिकाला फटका बसेल.

त्यामुळं सरकारच्या अंदाजापेक्षा यंदा उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केला जातेय. मार्च महिन्यात तापमान जास्त राहिल्यास हरभरा दरातही सुधारणा दिसू शकते. पण त्यासाठी मार्च महिन्यातील स्थिती स्पष्ट व्हावी लागेल, असे जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

SCROLL FOR NEXT